भाजपला आव्हान दिलेल्या शिवसेनेसाठी खूशखबर, काँग्रेसच्या गोटात हालचाली!

सेना-भाजपचा सत्ता संघर्ष वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून सेनेला पाठिंबा द्यावा असं म्हटलं आहे.

सेना-भाजपचा सत्ता संघर्ष वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून सेनेला पाठिंबा द्यावा असं म्हटलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 02 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटला तरी अद्याप सत्तास्थापनेची चिन्हे दिसत नाहीत. महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी शिवसेना-भाजप यांच्यातील वाटाघाटीमुळं सरकार स्थापनेचं घोडं अडलं आहे. शिवसेना त्यांच्या 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम असून आता आक्रमक भूमिका घेतली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं काही ठरलंच नाही म्हटलं होतं. भाजप-सेनेतली धुसफूस काही केल्या कमी होत नसून आता राज्यात वेगळ्याच राजकीय समीकरणांची चर्चा केली जात आहे. भाजपने शिवसेनेच्या मागण्या मान्य केल्या नाहीत आणि जर सेनेनं नरमाईची भूमका घेतली नाही तर आघाडीच्या पाठिंब्याने सेनेला सत्ता स्थापन करता येऊ शकते. यासाठी काँग्रेसचे राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींना पत्र लिहून शिवसेनेला पाठिंबा द्यावा असं म्हटलं आहे. दलवाई यांनी पत्रात म्हटलं की, प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपती निवडीवेळी शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. आता भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसने सेनेला समर्थन द्यावं. 2007 मध्ये झालेल्या राष्ट्रवती निवडीवेळी शिवसेनेनं काँग्रेस उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना समर्थन दिलं होतं. त्यानंतर 2012 मध्ये प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण जनतेचा कौल मान्य करून विरोधी पक्षातच बसणं पसंद करू असं स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, जर राष्ट्रवादी आणि सेनेनं मिळून सत्ता स्थापन केली तर आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू. सेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जर तसा काही प्रस्ताव आला तर यावर चर्चा करेन असंही ते म्हणाले. राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत नाचक्की, 'या' कारणामुळे सोनिया गांधी नाराज दरम्यान, भाजपच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी दिली आहे. ही धमकी म्हणजे जनादेशाचा अपमान आहे. राष्ट्रपती कोणाच्या खिश्यात नाही. राष्ट्रपतींना या गोंधळात ओढू नये, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. युतीत कोणतीही चर्चा झाली नाही. युतीच्या चर्चेच्या बातम्या खोट्या आहेत. कोणी शपथविधीचा मुहूर्त काढत असेल तर तो मुहूर्त महत्त्वाचा नाही. बहुमताचा मुहूर्त महत्वाचा आहे. महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होईल, असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. निकालानंतरच्या गोंधळावर शरद पवारांचं आक्रमक भाष्य,पाहा काय म्हणाले... महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापनेवरून युतीमध्ये वाद सुरू आहे. भाजप आणि सेनेत पडलेल्या सत्तेच्या ठिणगीमध्ये आता भाजपने 'एकला चलो रे'ची भूमिका मांडली आहे. मंगळवारी 5 नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर भाजपा मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे. शिवसेना सोबत आली तर त्यांच्याबरोबर अन्यथा भाजपाचा एकट्याचा शपथविधी करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. वाचा : 'महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होणार', संजय राऊत पुन्हा भाजपवर बरसले वाचा : ...तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल : उदयनराजे पोरांची फी बाकी, मंत्रालयासमोर आत्महत्याच करेन; पवारांसमोर शेतकरी ढसाढसा रडला
    First published: