Home /News /maharashtra /

काँग्रेस आमदाराच्या सूनेचा पती आणि सासरच्या मंडळीवर 1 कोटी खंडणीचा आरोप, गुन्हा दाखल

काँग्रेस आमदाराच्या सूनेचा पती आणि सासरच्या मंडळीवर 1 कोटी खंडणीचा आरोप, गुन्हा दाखल

राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुतणीला सासरच्या लोकांकडून शिवीगाळ, मारहाण आणि खंडणी मागितल्याची तक्रार कराड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुतणीला सासरच्या लोकांकडून शिवीगाळ, मारहाण आणि खंडणी मागितल्याची तक्रार कराड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुतणीला सासरच्या लोकांकडून शिवीगाळ, मारहाण आणि खंडणी मागितल्याची तक्रार कराड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

सातारा, 12 सप्टेंबर : एकीकडे राज्यात महिलांवर अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. तर दुसरीकडे आता राजकीय व्यक्तींच्या घरातही महिलांवर अत्याचाराचे प्रकरणं समोर येत आहे. राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Minister of State for Co-operation Balasaheb Patil) यांच्या पुतणी आणि काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील (congress mla p.n. patil) यांच्या सून आदिती पाटील (aditi patil) यांना सासरच्या लोकांकडून शिवीगाळ, मारहाण आणि खंडणी मागितल्याची तक्रार कराड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. राज्यात महिलावरील अत्याचारांच्या घटना घडत असताना मंत्री आणि आमदारांच्या सून आणि लेकी सुद्धा सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुतणी आणि कोल्हापूरमधील करवीर तालुक्‍याचे काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील यांच्या सून आदिती पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मैत्रिणी म्हणाली,दरोडा टाकूया, पठ्ठ्यांनी डॉक्टराच्या घरातून लुटले 7 लाख, पण... आदिती पाटील यांनी सासरे पी.एन.पाटील आणि त्यांचा मुलगा  राजेश पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सासरच्या लोकांकडून शिवीगाळ, मारहाण आणि खंडणी मागितल्याचा आरोप आदिती पाटील यांनी केला आहे. याबद्दल तक्रार कराड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार कराड शहर पोलिसांनी काँग्रेसचे आमदार.पी.एन पाटील यांच्यासह मुलगा राजेश आणि टिना पाटील यांच्यावर एक कोटींची खंडणी आणि मानसिक, शारीरिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नवविवाहित महिलांनी 1 वर्षासाठी प्रेग्नंसी पुढं ढकलावी; या सरकारचा अजब-गजब निर्णय काही दिवसांपूर्वी, वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास खडस (BJP MP Ramdas Tadas) यांच्या घरातही असाच गृहकलह पाहण्यास मिळाला होता. त्यामुळे मुलगा पंकज तडस (pankaj tadas) यांने पुन्हा एका आपली पत्नी  पूजासोबत वैदिक पद्धतीने लग्न केलं होतं. रामदास तडस यांच्या सून पूजाचा एक व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (NCP Rupali Chakankar) यांनी ट्विट केला होता. यात पूजाने आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर त्याच दिवशी नाट्यमय घडामोडींना वेग आला. पंकज तडस यांनी पूजासोबत वैदिक पद्धतीने विवाह केला. नगर पालिकेत जाऊन रितसर नोंदणी सुद्धा केली. विशेष म्हणजे, मुलगा पंकज तडस आणि पूजाचं लग्न झालं आहे. पण, तिने तडस कुटुंबीयांवर आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. लग्न झाल्यानंतर आता पूजानं  आपली कोणतीही तक्रार नसल्याचं म्हटलं आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Congress, Mla

पुढील बातम्या