Home /News /maharashtra /

काँग्रेस आमदाराने विनामास्क मंदिराच्या गाभाऱ्यात केली पूजा, शासकीय नियमांना केराची टोपली

काँग्रेस आमदाराने विनामास्क मंदिराच्या गाभाऱ्यात केली पूजा, शासकीय नियमांना केराची टोपली

आज पहाटे साडेपाच वाजता काँग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगताप (Congress Mla sanjay jagatap) यांच्या हस्ते सपत्नीक (jejuri khandoba temple) खंडेरायाची महापूजा, अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

    पुरंदर, 16 नोव्हेंबर : गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरं (temples open) अखेर आजपासून उघडण्यात आली आहे. कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नियम आणि अटींसह परवानगी देण्यात आली आहे. पण, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या आमदाराने नियम मोडल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे आमदार संजय जगताप (Congress Mla sanjay jagatap) यांनी विनामास्क  मंदिराच्या गाभाऱ्यात (jejuri khandoba temple) जाऊन पूजा केली आहे. गेली आठ महिन्यांपासून जास्त काळ जेजुरीचा खंडोबा गड कोरोनाच्या परिस्थितीमुळे बंद होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर मंदिरे भाविकांसाठी देव दर्शनासाठी उघडण्यात आली आहेत.  आज पहाटे साडेपाच वाजता काँग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सपत्नीक खंडेरायाची महापूजा, अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. देवाची भूपाळी, सनईचे मधुर सूर आणि महाआरतीच्या मंगलमय वातावरणात आज जेजुरीगड जागा झाला. पण, मुख्य गाभाऱ्यात जगताप यांनी सहपत्नी पूजा केली तेव्हा त्यांनी मास्क घातला नव्हता. एवढंच नाहीतर पूजा करवून घेताना पुजाऱ्यांनी सुद्धा मास्क घातलेला नव्हता. राज्य सरकारने मंदिरं उघड असताना मंदिरात मास्क वापरणे बंधनकारक आहे, असं स्पष्टपणे सांगितले होते. पण, जगताप आणि मंदिर प्रशासनाकडून नियमांची पायमल्ली केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, देव संस्थानाकडून यासाठी शासकीय नियम व अटी पाळत भाविकांना दर्शनाची सुविधा निर्माण केला आहे. सॅनिटायझेशन, थर्मल स्कॅनिंगची सुविधा निर्माण केली असून एका वेळी 100 भाविकांना गडकोटात सोडण्यात येणार आहे. मुख्य प्रवेश द्वारातून गडकोटात प्रवेश देण्यात येणार आहे तर दर्शनानंतर माघील पश्चिमेच्या दरवाजातून बाहेर पडता येणार आहे. भाविकांना कासाववरून मुख दर्शन दिले जाणार आहे. मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रविवारी संध्याकाळपासूनच राज्यभरातील मंदिरांमध्ये साफ सफाई करून भाविकांसाठी मंदिरं उघडण्यात आली आहे. पण, बऱ्याच ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. पुण्यात मंदिर उघडण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत म्हणून पुणे शहरातील आठही विधानसभा मतदार संघातील मंदिरामध्ये शिवसेनेच्या वतीने, सुरक्षित अंतर राखून आरती करण्यात येणार आहे. कागदपत्र पाहण्यासाठी गाडी थांबवली, त्यानं पोलिसालाच गाडीच्या बोनेटवर बसवलं तर भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनाला यश आले असं म्हणत, सरकारने भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे खुले केले. रविवारी सकाळी 9.00 वाजता दगडूशेठ गणपतीची महाआरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे, असं भाजपने जाहीर केले आहे. एवढंच नाहीतर मुंबईत भाजपचे आमदार राम कदम यांनी वाजत गाजत सिद्धीविनायक मंदिरात जाणार असल्याची घोषणाच केली आहे. दरम्यान, सिद्धीविनायक मंदिर तब्बल 8 महिन्यांनी सुरू झालं आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याचा पहिला मान मुंबईतील घाटकोपर इथल्या अमित नाईक यांना मिळाला आहे. सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी ऑनलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. आज 1 हजारांचे ऑनलाईन बुकिंग झालं आहे. ऑफलाईनसाठी क्यू आर कोड देण्यात आला आहे. दर तासाला 100 असे 10 तास, आज 1000 भाविकांना दर्शन देण्यात येणार आहे. खासगी बसनं अचानक घेतला पेट, चालकाच्या प्रसंगावधानानं वाचला जीव, पाहा VIDEO तर औरंगाबादचे ग्रामदैवत भद्रा मारोती मंदिरही उघडले आहे. सेनेचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून भद्रामारुती मंदिर भाविकांसाठी उघडे करण्यात आले.  चंद्रकांत खैरे  यांनी सर्व प्रथम मंदिर उघडण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या