Home /News /maharashtra /

काँग्रेस आमदार रणजित कांबळे अडचणीत; अधिकाऱ्यांना धमकी दिल्याप्रकरणी अटकेची मागणी

काँग्रेस आमदार रणजित कांबळे अडचणीत; अधिकाऱ्यांना धमकी दिल्याप्रकरणी अटकेची मागणी

MP Ramdas Tadas on Ranjit Kamble: जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धमकावणारे आमदार रणजित कांबळे यांच्या अडचणी वाढत असल्याचं दिसत आहे.

    नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 11 मे: काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे (Congress MLA Ranjit Kamble) यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकावल्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांच्या अटकेची मागणी होऊ लागली आहे. आमदार रणजित कांबळे यांनी अनेक अधिकाऱ्यांना धमक्या दिल्यात, त्यांना त्वरीत अटक करा अशी मागणी भाजपाचे खासदार रामदास तडस (BJP MP Ramdas Tadas) यांनी केली आहे. राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले (Wardha District health officer Ajay Davale) यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. डॉ. डवले यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण तापताना दिसत आहे. भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी कांबळे यांना अटक करण्याची मागणी केली असून, याचा थेट परिणाम आरोग्य यंत्रणेवर होईल असा इशारा खासदार तडस यांनी दिला आहे. भाजपाने या प्रकरणात उडी घेतल्याने आता प्रकरण कोणत्या वळणावर जाते हे पाहावे लागणार आहे. वाचा: आदित्य ठाकरेंचं पर्यावरण प्रेम पूर्णतः बोगस; आमदार अतुल भातखळकर यांचं टीकास्त्र नेमकं काय आहे प्रकरण? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामध्ये तपासणी शिबिर घेतली जात आहेत. पण, वर्ध्याच्या नाचणगाव येथे लॉकडाऊन असताना तपासणी शिबिर आयोजित केल्या गेलं. त्यावरून देवळीचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले यांना विचारणा केली. लॉकडाऊन असताना राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या शिबिरावर राजकारण करत आहे का असा प्रश्न आमदार कांबळेनी करत चाचणी शिबिरा बद्दल आक्षेप घेतला. यावेळी संतप्त झालेल्या आमदार रणजित कांबळे यांचा बोलण्याच्या तोल सुटला आणि जिल्हा आरोग्य अधिकाकाऱ्यास शिवीगाळ करत धमकी दिली. या संपूर्ण प्रकरणावरुन महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने कामबंद आंदोलन सकाळी सुरू केले होते. यानंतर आमदार रणजित कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. कोरोनाची परिस्थिती बघता डॉक्टरांनी आंदोलन पुढं ढकललं.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Coronavirus, Wardha

    पुढील बातम्या