मुंबई, 11 मे- आझाद मैदान येथे मराठा समजाच्या विद्यार्थ्यांची काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी शनिवारी भेट घेतली. प्रत्येक प्रश्न सुटू शकतात फक्त शासनाची इच्छाशक्ती पाहिजे. आज हे विद्यार्थी आत्महत्याची भाषा करत आहेत तशी वेळ सरकारने येऊ देवू नये. मराठा समाजावर अन्याय होऊ नये आणि मराठा समाजावरच प्रश्न का उभे राहतात, याचा सुद्धा विचार करणे गरजेचे असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरकारी वकिलांची फौज उभी करणार असं सांगण्यात आलं होतं. मग सरकार कुठेतरी कमी पडतोय का, हा प्रश्न समोर आला आहे. आरक्षणाचा कायदा लागू झालेला आहे. त्याचा उपयोग या मुलांना नसेल तर त्या कायद्याचा काय उपयोग, या सर्व मुलांशी चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय सरकारने द्यावा. मराठा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरायची वेळ येऊ देवू नका, असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिला आहे. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आपण वाचली तर शेवटच्या दोन-तीन ओळी हेच सांगतात, या एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी स्वीट सिच्युएशनमध्ये त्यांनी सरकारला सर्व अधिकार दिलेले आहेत. सरकारने इच्छाशक्तीनुसार निर्णय घ्यावा, असेही मत नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, मराठा समाजातील मुलांच्या वैद्यकीय प्रवेश सवलतीचा तिढा सुटलेला नाही. याच कारणामुळे मराठा समाजातील विद्यार्थी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी एकत्र आले आहेत.गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शैक्षणिक सवलतीबाबत विचार करण्यासाठी उद्या मुंबईतील शिवाजी मंदिरात मराठा मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पाडणार आहे.वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा तिढा अखेर सुटला आहे. कारण मराठा आरक्षणांतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांची फी राज्य सरकार भरणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. अण्णाभाऊ पाटील महामंडाळामार्फत विद्यार्थ्यांची फी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 30 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा आरक्षण लागू करण्यात आलं. मात्र नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार या आरक्षणाचा लाभ मेडिकल विभागातील कोणत्याच विद्यार्थ्याला घेता येत नाही. कारण मराठा आरक्षण लागू होण्याआधी 13 नोव्हेंबर रोजी मेडिकलचे नोटिफिकेशन आल्याने त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. सुप्रीम कोर्टानेही नागपूर खंडपीठाचा हा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे हा प्रश्न नेमका कसा सोडवला जाणार, हे पाहावं लागेल.
VIDEO: अंधेरी स्टेशनमध्ये अवंतिका एक्सप्रेस अंगावरून धावल्यानंतरही 'तो' सहीसलामत!