Home /News /maharashtra /

काँग्रेस आमदाराकडून राजेश टोपेंचे जाहीर कौतुक मात्र सत्कार करण्यास दिला नकार, कारण...

काँग्रेस आमदाराकडून राजेश टोपेंचे जाहीर कौतुक मात्र सत्कार करण्यास दिला नकार, कारण...

Congress MLA refused to felicitate Rajesh Tope: जालना येथील एका कार्यक्रमात काँग्रेस आमदाराने आरोग्यमंत्री राजेश टोपे याचं कौतुक केलं खरं पण सत्कार करण्यास नकार दिला.

जालना, 27 जुलै : जालन्यात (Jalna) काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल (MLA Kailash Gorantyal) यांनी पक्षभेद बाजूला ठेवत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं (Rajesh Tope) एका कार्यक्रमात जाहीर कौतुक केलं. मात्र त्यांचा सत्कार करण्यास त्यांनी जाहीरपणे नकार दिला. आमदार गोरंटयाल यांच्या या अजब भूमिकेने उपस्थितांच्या भुवयाच उंचावल्यात. पाहुयात नेमकं काय आहे यामागचं कारण... कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर जालन्यात 100 खाटाच्या मेडिकॅब कोविड हॉस्पिटल उभारण्यात आलं आहे. त्याचबरोबर नेत्रचिकित्सल्याच्या अत्याधुनिक फेको मशिनसह नुतनीकरण केलेल्या इमारतीचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या उदघाटन सोहळ्यात मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसह स्थानिक काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांचीही प्रमुख उपस्थिती होती. दोन्ही प्रकल्पांचा विधिवत उदघाटन सोपस्कार पार पडल्यानंतर सूत्रसंचालकाने आमदार गोरंटयाल यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केलं. पुरात अडकलेल्या गंभीर कोरोना रुग्णाची NDRF च्या टीमकडून सुटका; कोल्हापुरातील LIVE VIDEO आमदार कैलास गोरंटयाल यांनी देखील पक्षभेद बाजूला ठेवत अपेक्षेप्रमाणे आरोग्यमंत्री राजेश टोपेंवर जाहीर कौतुकाचा वर्षाव केला. भाषण सुरळीत सुरू असतानाच आमदार गोरंटयाल यांनी टोपे यांचा सत्कार करण्यास जाहीररीत्या नकार दिला. आमदार गोरंटयाल यांच्या या अचानक बदललेल्या भूमिकेमुळे उपस्थितांच्या भुवया मात्र उंचावल्यात. सर्व प्रक्रिया आणि निकष पात्र करून देखील जालन्यात मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळत नाही मात्र परभणीचा प्रस्ताव नसताना त्यांना परवानगी मिळते याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे आपल्या शायराना अंदाजमध्ये आमदार गोरंटयाल यांनी मेडिकल कॉलेजसाठी पाठपुरावा करण्याची मागणी करत टोपेंवर मार्मिक ताशेरे ओढले. तर उपस्थित जालनेकरांनी देखील ओ सेठ... तुम्ही नादच केला थेट म्हणत गोरंटयाल यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Rajesh tope

पुढील बातम्या