पुण्यातही काँग्रेसला हादरा? आमदाराने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

पुण्यातही काँग्रेसला हादरा? आमदाराने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेची वाट धरली आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार आणि प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी काल (शुक्रवारी) मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट आपल्या मुलाची लग्न पत्रिका देण्यासाठी आहे, असं आमदार गाडगीळ यांच्याकडून सांगितलं जात आहे. मात्र या भेटीमागे काही राजकीय गणित असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेस आमदार अनंत गाडगीळ यांची विधान परिषदेतील मुदत पुढच्या वर्षी संपत आहे. त्यामुळे आतापासूनच अनंत गाडगीळ यांनी शिवसेना प्रवेशासाठी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं बोललं जात आहे. गाडगीळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. कारण विधानपरिषदेतील काँग्रेसचे अभ्यासू आमदार अशी अनंत गाडगीळ यांची ओळख आहे.

'गाडगीळ घराण्यात जन्माला आलो नसतो तर...'

लोकसभा निवडणुकीदरम्यानही अनंत गाडगीळ यांनी काँग्रेसमधील कारभारावर आपली नाराजी व्यक्त केली होती. 'मी गाडगीळ घराण्यात जन्माला आलो नसतो तर कधीच काँग्रेस सोडली असती,' असं वक्तव्य अनंत गाडगीळ यांनी केल्याची चर्चा झाली होती.

दरम्यान, महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेची वाट धरली आहे. यामध्ये आता साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात उदयनराजेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीला मोठा हादरा बसू शकतो.

उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. उदनराजेंनी भाजपप्रवेश केल्यास राष्ट्रवादी बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. कारण साताऱ्यासह महाराष्ट्रातील इतर भागातही उदयनराजेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे.

VIDEO: गोविंदा आला रे आला! 'विजेता' सिनेमाच्या सेट सेलिब्रिटींनी फोडली हंडी

First Published: Aug 24, 2019 11:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading