संगमनेर, 26 मे: राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेणार त्या निर्णया बरोबर जाणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सूचक वक्तव्य संगमनेरमध्ये केलं. एका खासगी सोहळ्यात सत्तार आणि विखे एकाच मंचावर उपस्थित होते. विखेना मानणाऱ्या आम्हा सर्वांसाठी विखेंचा निर्णय अंतिम असेल असंही ते म्हणाले. दरम्यान शपथविधी 1 तारखे नंतर होणार असल्याचा गौफ्यस्फोटही अब्दुल सत्तार यांनी केला.