अब्दुल सत्तारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, काँग्रेसला मराठवाड्यातही हादरा?

अब्दुल सत्तारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, काँग्रेसला मराठवाड्यातही हादरा?

या भेटीनंतर अब्दुल सत्तारही आता भाजपच्या गोटात दाखल होणार का, याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 24 मार्च : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर शनिवारी रात्री सत्तार यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या समवेत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देत लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची भूमिका घेतली होती. पण त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. सत्तार यांनी गिरीश महाजनांसह थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर अब्दुल सत्तारही आता भाजपच्या गोटात दाखल होणार का, याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

वास्तविक सत्तार हे काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे आणि अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण जागावाटपावेळी चव्हाण यांनी सत्तार यांच्या नावाचा विचार न करता सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने सत्तार नाराज झाले. त्यानंतरच आता सत्तार भाजपमध्ये जाण्याचा विचार करतायत की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

राजीनामा देताना काय म्हणाले अब्दुल सत्तार?

'मी कुणावरही नाराज नाही. मी औरंगाबादमधून उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. मी काँग्रेसचा राजीनामा आधीच दिलेला आहे. आता काँग्रेस आमदार म्हणून बोलत नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढत देणार आहे,' अशी घोषणाही अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

'मला माझ्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आता मी माघार घेणार नाही,' असा आक्रमक पवित्रा सत्तारांनी घेतला आहे.

VIDEO : फडणवीसांकडून घटकपक्षांची मनधरणी की बोळवण?

First published: March 24, 2019, 6:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading