Home /News /maharashtra /

Sharad Pawar महाराष्ट्राचे CM असते तर चित्र जरा वेगळं असतं, काँग्रेसच्या मंत्र्यांचं मुख्यमंत्रिपदावरुन मोठं वक्तव्य, चर्चांना उधाण

Sharad Pawar महाराष्ट्राचे CM असते तर चित्र जरा वेगळं असतं, काँग्रेसच्या मंत्र्यांचं मुख्यमंत्रिपदावरुन मोठं वक्तव्य, चर्चांना उधाण

फाईल फोटो

फाईल फोटो

Maharashtra CM: राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार आहे. या आघाडीच्या सरकारमध्ये धुसफूस असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यातच आता काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री पदावरुन एक मोठं विधान केलं आहे.

पुढे वाचा ...
अमरावती, 10 एप्रिल : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) राजकीय पक्षांमध्ये धुसफूस असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. इतकेच नाही तर अनेकदा आमदारा, मंत्र्यांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केल्याचं समोर आलं. त्याच दरम्यान आता काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर (Minister Yashomati Thakur) यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरुन एक मोठं विधान केलं आहे. (Big statement of Minister Yashomati Thakur about Maharashtra CM post) शरद पवार साहेब आपण जर मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचे चित्र जरा वेगळे असते असं मोठं विधान मुख्यमंत्री पदावरून यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याने आघाडीत मुख्यमंत्री पदावरून धुसफूस तर सुरू नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काय म्हणाल्या यशोमती ठाकूर? यशोमती ठाकूर म्हणाल्या, छोटा मुंह बडी बात... पण साहेब आपण जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राचं चित्र आणखी काही तरी वेगळं असतं. टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही... पवार साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. महाविकास आघाडी ज्यावेळा झाली.. यापूर्वी साहेब मुख्यमंत्री होते पण आज काळाची गरज आहे. म्हणून ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी मी म्हटलं होतं. वाचा : BJP-MNS युती होणार? भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर आणि सभागृहाचे लोकार्पण सोहळाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलतांना मुख्यमंत्री पदाबाबद मोठं वक्तव्य केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या महिन्यातच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची एक बैठक होणार असून या बैठकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये गृहखात्याची अदला-बदल होण्याची चर्चा होण्याची शक्यता आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Amravati, Sharad Pawar (Politician), Yashomati thakur

पुढील बातम्या