मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोना लस मोफत म्हणजे BJPचा चुनावी जुमला, काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या संतापल्या

कोरोना लस मोफत म्हणजे BJPचा चुनावी जुमला, काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या संतापल्या

बिहार विधानभा निवडणुकीच्या धामधुमीत (Bihar Assembly Election 2020) भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठी घोषणा केली आहे.

बिहार विधानभा निवडणुकीच्या धामधुमीत (Bihar Assembly Election 2020) भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठी घोषणा केली आहे.

बिहार विधानभा निवडणुकीच्या धामधुमीत (Bihar Assembly Election 2020) भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठी घोषणा केली आहे.

अमरावती, 27 ऑक्टोबर: बिहार विधानभा निवडणुकीच्या धामधुमीत (Bihar Assembly Election 2020) भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे बिहारमध्ये प्रत्येक व्यक्तीला कोरोना लस मोफत टोचली जाणार आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये (Election Manifesto)तसा उल्लेखही केला आहे. मात्र, भाजपच्या या घोषणेनंतर संपूर्ण देशातून टीकेची झोड उठली आहे. आता त्यात काँग्रेस फायरब्रँड नेत्या आणि राज्याच्या महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी खोचक टीका केली आहे. बिहारमध्ये कोरोना लस मोफत वाटणे म्हणजे भाजपचा चुनावी जुमला असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. भाजप देशात भेदभाव करत असून इतर ठिकाणी जनावरे राहतात का? असा संतप्त सवालही यशोमती ठाकूर यांनी त्यांनी केला आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कोरोना लसीचं राजकारण करत असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. हेही वाचा... अजितदादा यांच्या पाठोपाठ आणखी एका खासदाराला कोरोनाची लागण कोरोनाच्या लशीबाबत केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने जाहीर केलेल्या जाहिरनाम्यात बिहारच्या जनतेला सत्तेत आल्यावर मोफत लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात कोरोना लसीवर पुन्हा एकदा गदारोळ सुरू झाला आहे. विरोधी पक्षांसह अनेक राज्य सरकारांनी सरकारच्या या आश्वासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्रातील मोदी सरकारला घेराव घातला. कोरोना लसीसंदर्भात वाढलेला राजकीय संघर्ष पाहता आता केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी मोठं विधान केलं आहे. हेही वाचा..सामान्यांना मोफत मिळू शकतं धान्य आणि रोखरक्कम, तिसऱ्या पॅकेजच्या तयारीत सरकार बिहारच नाही तर देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी सांगितलं की, या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा सुरू आहे. साधारण एका व्यक्तीला कोरोनाची लस देण्याचा खर्च साधारण 500 रुपये आहे. बालासोरमध्ये पोटनिवडणूक होणार असून प्रताप सारंगी तेथे प्रचारासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी या संदर्भात मोठं विधान केल्यामुळे आता पुन्हा एकादा चर्चेला उधाण आलं आहे.
First published:

Tags: BJP, Maharashtra, Yashomati thakur

पुढील बातम्या