Home /News /maharashtra /

अमित शाहांचा आधी राजीनामा घ्या, मग माझ्याकडे मागा, यशोमती ठाकूर यांचा भाजपवर पलटवार

अमित शाहांचा आधी राजीनामा घ्या, मग माझ्याकडे मागा, यशोमती ठाकूर यांचा भाजपवर पलटवार

    अमरावती, 5 नोव्हेंबर : महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Congress Minister Yashomati Thakur)यांना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणात शिक्षा झाली. यशोमती ठाकूर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) केली आहे. यशोमती यांना मंत्रिपदावरून काढल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray)यांना सरकार पडण्याची भीती आहे, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला. आता यशोमती ठाकूर यांनी भाजपवर पलटवार केला आहे. हेही वाचा...इनकमिंग सुरूच! एकनाथ खडसेंसह 5 माजी आमदारांनी हाती घेतला राष्ट्रवादीचा झेंडा यशोमती ठाकूर म्हणाल्या, भाजपला राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही. आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा, नंतरच माझ्याकडे राजीनामा मागा, अशा शब्दांत पलटवार केला आहे. चंद्रकांत पाटील यांचं आंदोलन केविलवाणं असल्याची टीका देखील यशोमती ठाकूर यांनी केली आहे. काय आहे प्रकरण? महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना आठ वर्षे जुन्या प्रकरणात यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यशोमती ठाकूर यांची शिक्षेविरुद्ध मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर शिक्षेला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. 24 मार्च 2012 रोजी अमरावतीच्या प्रसिद्ध अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाची हुज्जत घातल्या प्रकरणी यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस कॉन्सेटबलवर हात उगारल्याचाही आरोप होता. त्यावर गुरुवारी जिल्हा न्यायालायात सुनावणी पूर्ण झाली. न्या. उर्मिला जोशी यांनी यशोमती ठाकूर यांना प्रकरणात शिक्षा सुनावली. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. या प्रकरणाचा सविस्तर निकाल अद्याप हाती आलेला नाही. यशोमती ठाकूर यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत घातली. सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण आदी कलमं यशोमती ठाकुरांवर लावण्यात आली होती. ठाकूर यांची जामिनावर सुटकाही झाली आहे. बॅरिकेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न दुसरीकडे, केंद्र सरकारनं पारित केलेले कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी असून हे काळे कायदे तात्काळ मागे घ्यावे, यासाठी यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसनं गुरुवारी ट्रॅक्टर मोर्चा काढला. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसतर्फे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी लावलेले बॅरिकेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला, यावेळी आंदोलन व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. हेही वाचा...बापानंच केलं पोटच्या मुलीला विधवा, प्रेमविवाह केल्याच्या रागातून जावयाचा खून अमरावतीत निघालेल्या ट्रॅक्टर मोर्चाने शहर दणाणून गेले होते. या रॅलीत मोदी व सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या विधेयकावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Amit Shah, Maharashtra, Yashomati thakur

    पुढील बातम्या