'शाबासी और धोखा पीठ पीछे ही मिलता है' काँग्रेस मंत्र्याचा जानकरांना टोला

'शाबासी और धोखा पीठ पीछे ही मिलता है' काँग्रेस मंत्र्याचा जानकरांना टोला

'तुम्हा आम्हाला प्रस्थापितांच्या विरोधात लढाई लढायची, ही लढाई प्रस्थापितांविरुद्ध विस्थापित अशी आहे'

  • Share this:

जालना, 25 जानेवारी : 'तुम्हा आम्हाला प्रस्थापितांच्या विरोधात लढाई लढायची, ही लढाई प्रस्थापितांविरुद्ध विस्थापित अशी आहे. त्यामुळे तुम्ही सांभाळून राहा' म्हणत शायरीच्या अंदाजात काँग्रेसचे नेते आणि मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (mahadev jankar) यांना चिमटा काढला.

जालन्यामध्ये ओबीसी समाजाचा विशाल मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार भाषण केले.

'मी ओबीसी समाजासाठी महाराष्ट्रात फिरू लागलो तर अनेकांच्या पोटात दुखू लागलं. तुम्ही कोण कोण आलेत, ते पाहून सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनो, तुम्ही जे कोणी इथे आलात तर आता तुम्हाला आम्हाला सांभाळूनच राहावं लागेल. हक्क मिळवून देण्यासाठी आमचं काय होईल ते होईल त्याची आम्ही काळजी करत नाही. सामान्य कार्यकर्ता म्हणून बोलावलं तिथे उभं राहिल आणि बोललं ती लढाई लढेल, असा आश्वासन वडेट्टीवारांनी दिलं.

...त्या पराभवानंतर खचून गेलो, मन तुटलं', आठवणींनी ऋषभ पंत झाला भावुक

'तुम्हा, आम्हाला प्रस्थापितांच्या विरोधात लढाई लढायची आहे. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आहे. त्यामुळे महादेव जानकर आपण काळजी घेऊन लढा द्या, पीठ हमशा मजबूत रखनी चाहिये, क्यूँकि शाबासी और धोखा पीठ पीछे ही मिलता है' अशी शायरी म्हणत वडेट्टीवार यांनी जानकरांना टोला लगावला.

Published by: sachin Salve
First published: January 25, 2021, 1:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या