मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /OBC नेत्यांना व्हिडीओद्वारे जीवे मारण्याची धमकी, विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक खुलासा

OBC नेत्यांना व्हिडीओद्वारे जीवे मारण्याची धमकी, विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक खुलासा

'काही जण ओबीसी आरक्षणासाठी लढा देणाऱ्या नेत्यांना धमकी देत आहे. कोल्हापूरचे पाटील आहे, त्यांनी मारण्याची धमकी दिली आहे'

'काही जण ओबीसी आरक्षणासाठी लढा देणाऱ्या नेत्यांना धमकी देत आहे. कोल्हापूरचे पाटील आहे, त्यांनी मारण्याची धमकी दिली आहे'

'काही जण ओबीसी आरक्षणासाठी लढा देणाऱ्या नेत्यांना धमकी देत आहे. कोल्हापूरचे पाटील आहे, त्यांनी मारण्याची धमकी दिली आहे'

अमरावती, 30 मे: OBC आरक्षणाच्या मुद्यावरून वाद पेटला आहे. अशातच आरक्षणासाठी लढणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.  मोबाईलवर व्हिडीओ पाठवून धमकी देत असल्याचा धक्कादायक खुलासा वडेट्टीवार यांनी केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केले आहे. या मुद्यावर न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी ओबीसी आरक्षणासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकी देत असल्याची माहिती त्यांनी दिली.

'काही जण ओबीसी आरक्षणासाठी लढा देणाऱ्या नेत्यांना धमकी देत आहे. कोल्हापूरचे पाटील आहे, त्यांनी मारण्याची धमकी दिली आहे. मला, छगन भुजबळ, यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांना फेसबुकवर व्हिडीओ टाकून टॅग केलं जात आहे, तुम्हाला आम्ही मारू, ठोकून काढू अशा धमक्या देत आहे. पण, अशा धमक्यांमुळे प्रश्न थोडी सुटणार आहे, असा खुलासा वडेट्टीवार यांनी केला.

देशात होणार मिक्स लसीकरण? एकाच व्यक्तीला देणार दोन वेगवेगळे डोस, कारण...

लवकरच धमकी देणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. आरक्षणाचा प्रश्न धमकीने सुटणार नाही तर चर्चेने सुटणार आहे. धमकी न देता चर्चा करून प्रश्न सोडवावा, असं आवाहन सुद्धा वडेट्टीवार यांनी केलं आहे.

तसंच, 'मुळात मुख्य मुद्दा असा आहे की, मराठा समाजासाठी संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर जर दोन नेते एकत्र येत असतील तर स्वागताची बाब आहे. पण जर राजकीय दृष्टीने जर कुणाला फायदा होणार असेल तर दोन्ही नेत्यांनी याबद्दल सावध भूमिका घेतली पाहिजे', असंही वडेट्टीवार म्हणाले.

IPL 2021 : KKR ला सगळ्यात मोठा धक्का, महत्त्वाच्या खेळाडूची आयपीएलमधून माघार

त्याचबरोबर, मागासवर्गीयांना पदोन्नतीतील आरक्षण हे 2017 साली फडणवीस सरकारने रद्द केले. ओबीसीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले असले तरी आम्ही त्यासाठी न्यायालयीन लढाई लढू, असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

First published: