ठाकरे सरकारच्या मंत्र्याचे ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्याचा संशय, सायबर सेलकडे तक्रार

ठाकरे सरकारच्या मंत्र्याचे ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्याचा संशय, सायबर सेलकडे तक्रार

सतेज पाटील यांचं नावही नाहीसे झाले होते. एवढंच नाहीतर त्यांचा फोटो सुद्धा गायब झाला.

  • Share this:

मुंबई, 16 डिसेंबर : काँग्रेसचे (Congress) नेते आणि राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांचे ट्वीटर अकाऊंट हॅक (Twitter account hacked) झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  अचानक ट्वीटर अकाउंट लॉक झाले असून सर्व ट्वीट्स डिलीट झाले आहे. या प्रकारानंतर सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे.

आज सकाळी अचानक  सतेज पाटील यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट अचानक ट्वीट्स पाहण्यास मिळत नव्हते. तसंच सतेज पाटील यांचं नावही नाहीसे झाले होते. एवढंच नाहीतर त्यांचा फोटो सुद्धा गायब झाला.  त्यामुळे सतेज पाटील यांचे ट्वीटर अकाऊंट कुणी हॅक केले नाही ना अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु, ट्वीटर अकाऊंट जर हॅक झाले असते तर आता पर्यंत ट्वीटर अकाऊंटवरून चुकीचा मेसेज हॅकरकडून झळकला असता, पण तसाही प्रकार घडला नाही.

याबद्दल सतेज पाटील यांनी माहिती दिली की, ट्वीटर अकाऊंटवर अचानक फोटो आणि सर्व माहिती डिलीट झाली. अचानक खाते लॉक ही झालेले आहे. या संदर्भात टीव्टर तसंच मुंबई सायबर खाते यांच्याकडे तक्रार केली आहे.'

'नेमके कशामुळे अचानक ट्वीटर अकाऊंट लॉक झाले. टीव्टर खाते पाहणारे माझी सहकारी टीम यांनी टीव्टर खात्यात टेक्निकल सेटिंग चेंज काहीच केले नाही. तरी कसे काय अचानक सर्व बंद पडले याची चौकशी आता केली जाईल, असंही पाटील यांनी सांगितले.

तसंच, 'टीव्टरला याबद्दल ई-मेल करून नेमका काय प्रकार घडला याचा तपास घेण्यास सांगितले, अशी माहितीही गृहराज्यमंत्री पाटील यांनी दिली.

Published by: sachin Salve
First published: December 16, 2020, 10:46 AM IST

ताज्या बातम्या