न्यायालयाने दोषी ठरवलेल्या काँग्रेस मंत्र्याने राजीनामा द्यावा, भाजपची आक्रमक मागणी

न्यायालयाने दोषी ठरवलेल्या काँग्रेस मंत्र्याने राजीनामा द्यावा, भाजपची आक्रमक मागणी

नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आमदारकी व मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अमरावती जिल्हा भाजपने केली आहे.

  • Share this:

अमरावती, 31 ऑक्टोबर : 'राज्याच्या महिला,बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना 2012 च्या पोलीस कर्मचारी मारहाण प्रकरणी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने 3 महिन्याची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे न्यायालयाने दोषी ठरविलेल्या यशोमती ठाकूर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आमदारकी व मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,' अशी मागणी अमरावती जिल्हा भाजपने केली आहे.

भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत यशोमती ठाकूर यांच्याविरोधात घोषणा दिल्या. कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांना मारहाण करणे चुकीचे आहे. त्यामुळे न्यायालयाने दोषी ठरवून सुद्धा यशोमती ठाकूर यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे त्यांनी जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी अशी खरमरीत टीका भाजपकडून करण्यात आली आहे.

भाजपकडून ही आक्रमक मागणी करण्यात आल्यामुळे यशोमती ठाकूर याला कसं उत्तर देतात, हे पाहावं लागेल.

दुसरीकडे, अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर अखेर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील कृषी विभागातील पर्यवेक्षक अरुण कुमार बेठेकर यांनी 27 ऑक्टोबर रोजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

मंत्र्याविरोधात खळबळ उडवून देणारी पोस्ट व्हायरल केल्याने युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांनी धारणीसह राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात अखेर विभागीय कृषी संचालक पर्यवेक्षक यांनी अरुण बेठेकर यांचे निलंबनाचे आदेश काढले आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 31, 2020, 6:48 PM IST

ताज्या बातम्या