संगमनेर, 01 जानेवारी : आपल्या लाडक्या नेत्याच्या नावाने गावभर बॅनर आणि होर्डिंग लावण्यात कार्यकर्ते तरबेज असतात. संगमनेरमध्ये सुद्धा काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb Thorat) यांचे नववर्षाच्या निमित्ताने होर्डिंग लावले होते. पण, खुद्द बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना आपले होर्डिंग काढायला सांगितले.
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी चांगलीच कानउघडणी केली. थोरात यांनी स्वतःचेच फलक कार्यकर्त्यांना उतरवायला लावले. कार्यकर्त्यांनी शहरात नविन वर्षाच्या स्वागताचे बोर्ड लावले होते. पण, थोरात यांना कार्यकर्त्यांची ही चमकोगिरी अजिबात आवडली नाही. त्यांनी स्वत: बस स्थानकावर जाऊन होर्डिंग हटवायला लावले. 'कोणत्याही कार्यकर्त्याने माझेच नव्हे तर कोणाचेही फ्लेक्स लावtन विद्रुपीकरण करू नये. सुंदर परिसर त्यामुळे विद्रुप होतो, अशी ताकीद सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाशिममध्ये भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार
दरम्यान, बाळासाहेब थोरात हे शिर्डीच्या दौऱ्यावर होते. यावेळी औरंगाबादच्या नामकरण वादावर थोरात यांनी परखड भूमिका मांडली. तसंच, या वादावर भाजपला बोलण्याचा अधिकार नाही, असा टोलाही थोरातांनी फडणवीसांना लगावला.
काँग्रेसने नेहमीच शहरांची नाव बदलण्यास विरोध केला आहे. शहरांची नावं बदलून काय साध्य होणार आहे. शेवटी सर्व सामान्य नागरिकाच्या आयुष्यात कसा बदल होईल, हे महत्त्वाचे आहे. देशात अनेक शहरं आणि गावांची नावं बदलली. पण, नाव बदलल्यामुळे तिथल्या नागरिकाच्या आयुष्यात काही बदल झाला का? हे महत्त्वाचे आहे. लोकांच्या आयुष्यात बदल घडवता आला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असं थोरात म्हणाले.
थर्टी फस्टच्या दिवशी 3 पिस्तुल विकण्यासाठी आला होता तरुण, पण...
'छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आमचे दैवत आहेत. पण भारतीय जनता पक्षाला यावर बोलण्याचा अधिकार नाही. आरएसएसने संभाजी महाराजांबद्दल केलेलं लिखाण अतिशय कटू आहे. निवडणूक आली की, भावनेचं राजकारण करायचं काम मनसे आणि भाजप करत असल्याची टीका थोरातांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.