Home /News /maharashtra /

बाळासाहेब थोरात स्वीकारणार नाही 'ही' जबाबदारी, म्हणाले...

बाळासाहेब थोरात स्वीकारणार नाही 'ही' जबाबदारी, म्हणाले...

'मी खूप सिनिअर आहे. जिल्ह्यात अनेक आमदार आणि मंत्री आहे. त्यांना संधी दिली पाहिजे'

    पुणे, 04 जानेवारी : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकासआघाडी सरकार स्थापन केलं. परंतु, मंत्रिमंडळाच्या जम्बो शपथविधीनंतरही खातेवाटपाचा निर्णय अजूनही झाला नाही. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्याच जिल्ह्याचं पालकमंत्री स्वीकारण्याबाबत नकार दिल्याचं समोर आलं आहे. खातेवाटपाबाबत आजही मंत्रिमंडळाची चर्चा झाली. आज कुठल्याही क्षणी खातेवाटपाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. मी खूप सिनिअर आहे. जिल्ह्यात अनेक आमदार आणि मंत्री आहे. त्यांना संधी दिली पाहिजे. मी नगर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद जरी स्वीकारलं नाही तरी पालक आहे, अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली. तसंच, काळाच्या ओघामध्ये राजकारणाला थोडा वेग आला आहे. तिन्ही पक्ष मिळून एकत्र आले आहे. त्यामुळे जागा कमी आहे. त्यामुळे काही इच्छुकांना मंत्रिपद देऊ शकलो नाही, हे वास्तव आहे. नाराज नेत्यांनी थोडं समजून घेतलं पाहिजे, असं आवाहनही थोरात यांनी केलं. भाजप नेत्यांची अवस्था बिकट आहे.  सत्ता न मिळाल्याने  पाण्याबाहेर मासा कसा तडफड करत असतो तशी अवस्था विरोधकांची झाली आहे, असा टोलाही थोरात यांनी भाजपला लगावला. मंत्रीपदासाठी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल बंडाच्या भूमिकेत आहे. याबद्दल थोरात यांना  विचारले असता ते म्हणाले की, 'कैलास गोरंटयाल यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, त्यांची नाराजी दूर होईल आणि आम्ही एकत्र काम करणार आहोत.' काँग्रेसच्या मंत्र्यांची संभाव्य यादी - बाळासाहेब थोरात - महसूल -अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम - के.सी.पडवी - आदिवासी विकास - विजय वडेट्टीवार - ओबीसी ,खार जमिनी,मदत आणि पुनर्वसन - यशोमती ठाकूर - महिला बालविकास - वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण - अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्य - सुनिल केदार - क्रीडा व युवक कल्याण, पशुसंवर्धन, दुग्धविकास - अस्लम शेख - वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे - नितीन राऊत - ऊर्जा - बंटी पाटील - गृह, गृहनिर्माण - विश्वजीत कदम - सहकार, कृषी
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Congress, Sharad pawar, Shiv sena

    पुढील बातम्या