मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चंद्रकांत पाटलांनी दिले होते ईडीच्या कारवाईचे संकेत, अशोक चव्हाण म्हणाले...

चंद्रकांत पाटलांनी दिले होते ईडीच्या कारवाईचे संकेत, अशोक चव्हाण म्हणाले...

देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या (Deglur assembly election bopolls result) निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नांदेडमध्ये तळ ठोकून होते.

देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या (Deglur assembly election bopolls result) निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नांदेडमध्ये तळ ठोकून होते.

'त्यांना एवढी माहिती कुठून मिळते हे मला माहिती नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत राहण्यासाठी ते अशी विधान करत असतात'

नांदेड, 19 ऑक्टोबर : नांदेडमध्ये (nanded) देगलूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाडा तापला असून थेट ईडीच्या (ed) कारवाईच्या इशाऱ्यावर पोहोचला आहे. भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी ईडीच्या कारवाईचे संकेत दिले होते. पण, त्यांना ही माहिती कुठून मिळेल हे मला माहिती नाही, 'निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत राहण्यासाठी अशी विधान करतात' असा टोला काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी दिला.

भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ईडीच्या कारवाई बाबत भाष्य केले होते. नांदेडमधील काँग्रेस नेत्यांवर ईडीची पुढची कारवाई होईल असं संकेत त्यांनी अप्रत्यक्षपणे दिले होते अर्थात त्यांचा रोख काँगेसचे नांदेड मधील नेते अशोक चव्हाण यांच्याबद्दल होता. दरम्यान यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत पाटलांना फटकारून काढलं.

जेलमधून बाहेर पडताच 2 खुनाची केली तयारी, एकाची केली हत्या, सोलापुरात खळबळ

'त्यांना एवढी माहिती कुठून मिळते हे मला माहिती नाही. मला यावर अधिक भाष्य करायचं नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत राहण्यासाठी ते अशी विधान करत असतात. निवडणुकीच्या काळात त्यांना संभ्रम निर्माण करायचा आहे', असा टोला चव्हाण यांनी पाटलांना लगावला.

Team India च्या कोचला मिळणार इतका पगार, कॅप्टनलाही टाकणार मागे!

'सध्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांबाबत अनेक ठिकाणी अश्या गोष्टी सुरू आहेत. परंतु जे काही  लोकशाहीमध्ये जे काही सुरू आहे, ते अपेक्षित नाहीये. ठीक आहे, त्यांना काय करायचं ते करू द्या, असंही अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, किरीट सोमया यांनी देखील दिवाळीनंतर एका नेत्यावर बॉम्ब फुटणार असल्याचं म्हटलं आहे. यावर मात्र आपण काहींच बोलणार नाही, असं चव्हाण म्हणाले. हे सगळं राजकीय असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

First published: