कोल्हापूर पालिकेतही महाविकास आघाडीचा डंका, काँग्रेसच्या निलोफर आजगेकर महापौर

कोल्हापूर पालिकेतही महाविकास आघाडीचा डंका, काँग्रेसच्या निलोफर आजगेकर महापौर

कोल्हापूर महापालिकेत काँग्रसच्या निलोफर आजगेकर यांची महापौरपदी निवड झाली आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी होताना दिसला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यात भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय.

  • Share this:

कोल्हापूर, 10 फेब्रुवारी  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या 50 व्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे  काँग्रेसच्या निलोफर आजरेकर यांची निवड झाली. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा महानगरपालिकेवर फडकलाय. तर भाजपला प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच सत्तेपासून दूर राहाव लागलंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज मतदान झालं. मात्र आजच्या मतदानामध्ये नेहमीची चुरस पाहायला मिळाली नाही. कारण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं महापौरपदाची खांडोळी केल्याचा आरोप करत विरोधी भाजप ताराराणी आघाडीने या निवडीवरच बहिष्कार टाकला. त्यांच्या या बहिष्काराच्या पावित्र्यामूळे काँग्रेसच्या उमेदवार निलोफर आजरेकर विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या या निवडीची औपचारिकता पार पडली. एका बाजूला भाजप आणि ताराराणी आघाडीनं या निवडणुकीवर बहिष्कार टाकला असला तरी ताराराणी आघाडीचे नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी मात्र सभेला उपस्थिती लावत भाजप ताराराणीच्या उमेदवार अर्चना पागर यांच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे पगार यांना केवळ एक तर आजगेकर यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची अशी 48 मतं मिळाली.

ज्या पद्धतीने राज्यात महाविकास आघाडीचं समीकरण अस्तित्वात आलं तसंच राज्यभरात होताना दिसतंय. काँग्रेसच्या उमेदवार निलोफर आजगेकर यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेच्याही नगरसेवकांची मतं मिळाली. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे विधानसबा निवडणुकीतही भाजप प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात पक्षाला अपयश आलं. तर ज्या ताराराणी आघाडीवर भाजपची मदार होती. त्या ताराराणी आघाडीचे कर्तेधर्ते महादेवराव महाडिकही मागल्या काही वर्षांमध्ये जिल्हा आणि शहरात राजकारणात पिचाडीवर पडलेत. एक काळ असा होता जेव्हा महादेवराव महाडिकांच्या ताराराणी आघाडीचं महापालिकेवर अनेक वर्ष निर्विवाद सत्ता होती. मात्र विधान परिषदेला महादेवराव महाडिक यांचा सतेज पाटील यांनी पराभव केला. लोकसभेला धनंजय महाडिक यांचा पराभव झाला. तर विधानसभेत अमल महाडिक यांचा पराभव जाल्यानं महाडिक कुटुंब राजकारणात पिछाडीवर पडलं आहे. आता जिल्ह्यात गोकुळ दुधसंघाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. गोकुळ दूध संघावर अनेक वर्षांपासून महादेवराव महाडिकांची सत्ता आहे. महाडिकांचे वारंवार होणारे पराभव पाहाता रोज्याचं लक्ष आता गोकुळच्या निवडणुकीकडे लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: kolhapur
First Published: Feb 10, 2020 07:28 PM IST

ताज्या बातम्या