काँग्रेस उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता, पहिल्या यादीत कुणाची नावं?

काँग्रेस उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता, पहिल्या यादीत कुणाची नावं?

निवडणूक तारखांची घोषणा होण्याआधीच काँग्रेस आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी छाननी समितीच्या बैठकीनंतर 20 सप्टेंबरला यादी जाहीर होईल, असे संकेत दिले होते. त्यामुळे आज जाहीर होणाऱ्या यादीत नेमकी कुणाला संधी मिळते, याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.

भाजपच्या आक्रमक राजकारणाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसनेदेखील वेगानं हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे निवडणूक तारखांची घोषणा होण्याआधीच काँग्रेस आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. यामध्ये अनेक बड्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याची माहिती आहे. तसंच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही काँग्रेस पुन्हा संधी देण्याच्या विचारात आहे.

काँग्रेस उमेदवारांची संभाव्य यादी

पृथ्वीराज चव्हाण - कराड

अशोक चव्हाण - भोकर

बाळासाहेब थोरात - संगमनेर

यशोमती ठाकूर - तिवसा

विजय वडेट्टीवार - ब्रम्हपुरी

नितीन राऊत - नागपूर उत्तर

नाना पटोले - साकोली

बसवराज पाटील - उमरगा

वर्षा गायकवाड - धारावी

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जागावाटप पूर्ण झालं असून प्रत्येक दोन्हीही पक्ष प्रत्येकी 125 जागांवर निवडणूक लढविणार असून मित्र पक्षांसाठी 38 जागा सोडणार आहेत. राज्यातली बदलती समीकरणं लक्षात घेऊन काही जागांची अदलाबदलही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेसच्या छाननी समितीची दिल्लीतील काँग्रेस वॉर रूममध्ये नुकतीच बैठक झाली. बैठकीला महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक नेते सहभागी झाले होते. या बैठकीत जवळपास 50 ते 60 उमेदवारांच्या नावांवरती अंतिम निर्णय घेण्यात आला. पहिल्या 50 उमेदवारांची यादी 20 सप्टेंबरला जाहीर करण्यात येतील अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली होती.

VIDEO : आईची औषधं घेण्यासाठी लेक पुराच्या पाण्यात उतरला, बघ्यांनी मात्र व्हिडीओ काढला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 09:39 AM IST

ताज्या बातम्या