विधानसभेसाठी काँग्रेसच्या 50 उमेदवारांची यादी तयार

विधानसभेसाठी काँग्रेसच्या 50 उमेदवारांची यादी तयार

निवडणुका जाहीर होणार असल्याने राजकीय पक्षांच्या हालचालींनाही वेग आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांचं आज रणशिंग फुंकलं जाणार आहे. केंद्रीय निवडणुकीत आयोग दिल्लीतील पत्रकार परिषदेत दुपारी 12 वाजता महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. निवडणुका जाहीर होणार असल्याने राजकीय पक्षांच्या हालचालींनाही वेग आला आहे.

विधानसभेसाठी काँग्रेसच्या 50 उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करत नाही तोपर्यंत काँग्रेस आपली यादी जाहीर करणार नाही, अशी भूमिका काँग्रेस अध्यक्षांनी घेतली आहे.

काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी:

संगमनेर - बाळासाहेब थोरात

पलूस कडेगाव - विश्वजित कदम

कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण

भोकर - अशोक चव्हाण

सोलापूर - प्रणिती शिंदे

लातूर शहर - अमित देशमुख

तिवसा - यशोमती ठाकूर

नागपूर उत्तर - नितीन राउत

मीरा भाईंदर - मुजफ्फर हुसेन

करवीर - पी.एन.पाटील

शहादा - पद्माकर वळवी

नवापूर - शिरीष नाईक

कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील

पुणे कन्टोन्मेंट - रमेश बागवे

फुलंब्री - कल्याण काळे

मुंबादेवी - अमीन पटेल

धारावी - वर्षा गायकवाड

चांदिवली - नसीम खान

कुलाबा - भाई जगताप

धुळे - कुणाल पाटील

ब्रम्हपुरी - विजय वडेट्टीवार

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जागावाटप पूर्ण झालं असून प्रत्येक दोन्हीही पक्ष प्रत्येकी 125 जागांवर निवडणूक लढविणार असून मित्र पक्षांसाठी 38 जागा सोडणार आहेत. राज्यातली बदलती समीकरणं लक्षात घेऊन काही जागांची अदलाबदलही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेसच्या छाननी समितीची दिल्लीतील काँग्रेस वॉर रूममध्ये नुकतीच बैठक झाली. बैठकीला महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक नेते सहभागी झाले होते. या बैठकीत जवळपास 50 ते 60 उमेदवारांच्या नावांवरती अंतिम निर्णय घेण्यात आला.

VIDEO: 'वाघासमोर तुकडा फेकलाय', अमोल कोल्हेंची शिवसेनेवर जहरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 11:07 AM IST

ताज्या बातम्या