Home /News /maharashtra /

यशोमती ठाकूर यांचा थेट इशारा, सरकार स्थिर चालवायचं असेल तर....

यशोमती ठाकूर यांचा थेट इशारा, सरकार स्थिर चालवायचं असेल तर....

काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या बाल व महिला कल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

    मुंबई, 5 डिसेंबर: काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या बाल व महिला कल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकार स्थिर चालवायचं असेल तर आमच्या नेत्यावरील टीका टाळा, असा थेट इशारा यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray ) त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा नामोल्लेख न करता दिला आहे. शरद पवार यांनी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर सवाल उपस्थित केला होता. त्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर नाराज झाल्या असल्याचं दिसत आहे. त्यांनी ट्वीट करून सरकारमधील नेत्यांनी आघाडी धर्म पाळा, असं मोठं विधान शरद पवार यांच्या नामोल्लेख न करता केलं आहे. हेही वाचा...रक्ताचा मोठा काळाबाजार! 500 रुपयांना मिळणाऱ्या बॅगसाठी मोजावे लागतात 2000 यशोमती ठाकूर म्हणाल्या, महाविकास आघाडीमधील काही नेत्यांच्या मुलाखती तसेच वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले लेख माझ्या निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रत स्थिर सरकार हवं असेल तर काँग्रेसच्या नेतृत्त्वावर भाष्य करणं टाळा, प्रत्येकानं आघाडी धर्म पाळा'. यशोमती या सरकारमधील मंत्री आहेत. त्याचबरोबर त्या काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षही आहेत. यशोमती ठाकूर यांनी कदाचित पहिल्यांच मोठं वक्तव्य केल्याचं बोललं जात आहे. काय म्हणाले होते शरद पवार...? शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात दैनिक 'लोकमत'ला एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी राहुल गांधी यांच्याबाबत परखड मत व्यक्त केलं होतं. बरेच नेते हे त्यांच्या विचारांचे आहेत. पण त्यांनी वस्तुस्थिती आपण मान्य करायला हवी. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावं लागलं. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांच्यात सातत्याचा थोडासा अभाव असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. हेही वाचा... उद्धव ठाकरेंचीही टोलेबाजी... महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही.' पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काँग्रेसवर तुफान फटकेबाजी केली होती. 'सोनिया गांधी यांच्याशी एकदाच भेट झाली. बऱ्याच वेळा त्यांच्याशी फोनवर बोलणे होत असते. त्या नेहमी विचारता "सरकारचे चांगले काम सुरू आहे, आमची लोकं त्रास तर देत नाही ना", असं त्या खरंच विचारत असता. पण, मी तुमची बाजू त्यांच्याकडे लावून धरत असतो. निदान राष्ट्रवादीपेक्षा जास्त सहकार्य हे तुम्ही करता' असं उद्धव ठाकरे म्हणताच सभागृहात एकच हश्शा पिकला होता.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Rahul gandhi, Udhav thackarey, Yashomati thakur

    पुढील बातम्या