काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

अपघातातून विश्वजित कदम थोडक्यात बचावले आहेत.

  • Share this:

मुंबई, 7 नोव्हेंबर : काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांच्या गाडीला काल रात्री पुण्यात अपघात झाला. या अपघातातून विश्वजित कदम थोडक्यात बचावले आहेत. विश्वजीत कदम यांना अपघातात कोणतीही गंभीर इजा झाली नाही. त्यानंतर आता विश्वजित कदम एका कार्यक्रमासाठी कराडच्या दिशेने निघाले असल्याची माहिती आहे.

विश्वजीत कदम हे काल (बुधवारी)रात्री मुंबईतून पुण्यात गेले. मात्र त्यानंतर रात्री उशीरा विश्वजीत यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीचं मोठं नुकसानही झालं. मात्र सुदैवाने विश्वजीत कदम यांना कोणतीही जखम झाली नाही. या अपघाताचं वृत्त आता हाती आले असून अपघात नेमका कसा झाला, याबाबतची संपर्ण माहिती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही. मात्र विश्वजीत कदम हे सुखरूप असून ते साताऱ्यातील कराड येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत.

कराडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दाखल होणार

कराडमध्ये यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम पार पडणार आहे. कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुकमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कराडमध्ये जाणार आहेत. यावेळी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांची भेट होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसंच सुशीलकुमार शिंदे यांच्यासह आघाडीचे दिग्गज नेते आज कराडमधील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, राज्यातील काँग्रेस नेते आज दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठीच्या भेट घेण्याची शक्यता आहे. काल काँग्रेसच्या काही नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील बहुतेक काँग्रेस आमदार यांचा आग्रह भाजपा सरकार पुन्हा स्थापन होऊ नये असा होता. याबाबतची माहिती दिल्लीतील नेत्यांच्या कानावर घालण्यासाठी राज्यातील काही नेते दिल्लीत जाण्याची शक्यता आहे.

VIDEO : काँग्रेसचाही प्लॅन तयार, 'या' नेत्याने केला मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 11:27 AM IST

ताज्या बातम्या