अमरावती, 29 नोव्हेंबर : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी खळबळजणक वक्तव्य केले आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेवेळी सावकरांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून राज्यातील राजकारण चांगलच तापलं होते. दरम्यान या प्रकरण ताजे असतानाच काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
राहुल गांधीच्या सावरकरांवरील वक्तव्यानंतर, राज्यात आरोप प्रत्यारोपाने राजकारण पेटल आहे. राज ठाकरे यांच्या गोरेगाव येथील सभेनंतर काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी सावरकर देशाला कलंक होते अस खळबळजनक विधान अमरावतीत केले आहे. दरम्यान त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याला समर्थन देखील केले आहे.
हे ही वाचा : ...म्हणून भाजप, शिंदे गटाला पाठिंबा, संजय पवार यांचा मोठा गौप्यस्फोट; खडसेंवरही साधला निशाणा
इतकचं काय तर जगताप यांनी सेवानिवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटलांची क्लिप बघा. त्यांनी त्यात सविस्तर सांगितलं आहे. सावरकर खरे असतील तर कोळसे पाटील यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करा असे आव्हान दिले आहे. नीच राजकारण करणाऱ्या सावरकरांना आम्ही कधीही स्वातंत्र्यवीर म्हणणार नाही असे वक्तव्य वीरेंद्र जगताप यांनी केले
राहुल गांधी काय म्हणाले होते.
याआधी राहुल गांधींनीही नुकतंच सावरकरांबाबत मोठं विधान केलं होतं. 'सावरकर खरे देशभक्त नाहीत. ते तर इंग्रज राज्यकर्त्यांकडून निवृत्ती वेतन घेत होते. एकीकडे देशासाठी अवघ्या 24 व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत. सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा माफीची पत्रे इंग्रज सरकारला लिहिली', असं खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
अगोदरच राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाने महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धक्कादायक विधान करून वादाला तोंड फोडले आहे. भगवान बिरसा मुंडा हे इंग्रजांच्या प्रलोभनांना बळी पडले नाहीत. उलट सावरकर यांनी इंग्रजांना पत्रव्यवहार करून माफी मागितली होती, असं पटोले म्हणाले.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कृष्णा हेगडे शिंदे गटात, लगेच मोठी जबाबदारीही दिली
इतक्यावरच ते थांबले नाहीतर, तर पुढे नाना पटोले म्हणाले, की इतकंच नाही तर सावरकर हे इंग्रजांकडून महिन्याला 60 रुपये पेन्शनदेखील घेत होते. सावरकरांना अपमानित करणारा विचार जमिनीत गाडणार, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. फडणवीस यांच्या या विधानाचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले, की 'हेच सावरकर यांचे विचार आहेत.' नाना पटोले शेगावमध्ये आले असता याबद्दल बोलले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, Congress, अमरावतीamravati, महाराष्ट्र amravati