मुंबई, 4 नोव्हेंबर: राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रातील शेतकरी उद्धवस्त झाला आहे. निसर्ग चक्रीवादळमुळे झालेल्या नुकसानासाठी 1065 कोटी मदत मागितली, 814 कोटी पूर्व विदर्भातील पूर, दोन्ही वेळा टीम आली. प्रस्ताव पाठवले पण अजून एक रुपयाही मदत आलेली नाही.
अतिवृष्टीग्रस्त भागासाठी महाविकासआघाडी सरकारनं मदत जाहीर केली. दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत देण्याची आमची सर्व तयारी झाली आहे.
हेही वाचा.. नारायण राणेंच्या घोषणेला शिवसेनेचं जोरदार प्रत्युतर, आमदारानंच दिलं खुलं आव्हान
पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता आहे. मी निवडणूक अधिकाऱ्यांकडे या मदतीचे वाटप करण्याची परवानगी मागणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की, अतिवृष्टी झाल्यावर केंद्रीय पथकाने राज्यात पाहणीसाठी यावे, म्हणून मुख्य सचिव यांनी पत्र पाठवले. मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी 15 ऑक्टोबरला केंद्रीय पथक पाठवावे, म्हणून पत्र लिहिले. पण अजून ही केंद्रीय पथक आलेले नाही. अतिवृष्टी होऊन 15 दिवस झाले केंद्राचे पथक नाही आणि याआधी झालेल्या नुकसानासाठी एक रुपयांची मदत नाही. यावर आता भाजप नेते का गप्प आहेत, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक मोठा आवाज नका काढू पण पोपटासारखा तर आवाज काढा, असा टोला विजय वडेट्टीवारांनी लगावला आहे.
काय गौडबंगाल आहे?
महाराष्ट्रातील शेतकरी उद्धवस्त झाला आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन आक्रमक झालेले भाजप नेते केंद्र सरकारच्या मदतीसंदर्भात शांत का आहेत? कुठे गेले आहे विरोधक? कुठे गेली ही टीम? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला आहे. 18 दिवसानंतर ही टीम फिरलकी नाही, काय गौडबंगाल आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
हेही वाचा...पुणे- सोलापूर महामार्गावर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! मराठी तरुणीसह तिघींची सुटका
विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की, रेल्वे सुरू करण्यसाठी आम्ही केंद्र सरकारला तीन पत्र पाठवले आहेत. मात्र, ते काहीतरी त्रुटी काढतात. सर्वसामान्य लोकांसाठी शेड्युल तयार करून दिला आहे. सरकार रेल्वे सेवा सुरू करण्यास तयार नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत, असंही वडेट्टीवार त्यांनी सांगितलं. नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, Farmer, Maharashtra, Vijay wadettiwar