मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'आमच्या लोकांनी हलकटपणा दाखवला', काँग्रेस नेत्याची पक्ष सोडणाऱ्यांवर जहरी टीका

'आमच्या लोकांनी हलकटपणा दाखवला', काँग्रेस नेत्याची पक्ष सोडणाऱ्यांवर जहरी टीका

 काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं आहे.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं आहे.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं आहे.

मुंबई, 26 ऑक्टोबर : 'जनतेने आमच्या बाजूने कौल दिला होता. मात्र आम्ही नेते मंडळी समजण्यात कमी पडलो. उद्याचा महाराष्ट्र भाजपमुक्त होणार आहे. आमच्या लोकांनी सत्तेसाठी हलकटपणा दाखवला,' असं म्हणत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं आहे.

'काँग्रेसने आपल्यात विचारात बदल कारायला हवा. मतदार आपल्यासोबत आहे. जनतेच्या मनात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा विचार आहे. त्यासाठी असा कौल दिला आहे. सरकारने दबाव तंत्राचा वापर केला,' असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसंच स्वपक्षाचेही कान उपटले आहेत.

दरम्यान, निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत निकालांवर भाष्य केलं होतं. 'आम्हाला सत्ता स्थापन करण्याइतक्या जागा मिळवण्यात अपयश आलं आहे. मात्र समाधानकारक जागा नक्कीच मिळाल्या आहेत,' असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

निवडणूक निकालानंतर भाजप आणि शिवसेना सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील कोणता नेता विधानसभेचा विरोधी पक्षनेता होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबतच्या प्रश्नावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यावं, याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा होईल. त्यानंतर याचा निर्णय घेण्यात येईल.'

VIDEO : उदयनराजेंना आस्मान दाखवणारे 'पैलवान' पवारांच्या भेटीला, रंगला गप्पांचा फड

First published:

Tags: Congress, Maharashtra Assembly Election 2019, Vijay wadettiwar