Elec-widget

'सरकार कोणाचं महत्त्वाचं नाही', काँग्रेस नेत्याच्या ट्विटने सेनेची अडचण वाढली

'सरकार कोणाचं महत्त्वाचं नाही', काँग्रेस नेत्याच्या ट्विटने सेनेची अडचण वाढली

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने केलेल्या ट्विटनंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेसमोर अडचणी वाढल्या आहेत. सत्ता स्थापनेचा दावा केला तरी त्यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान असेल.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : राज्यातील सत्ता संघर्षाच्या नाट्याला भाजपच्या निर्णयानंतर वेगळं वळण लागलं आहे. भाजपने सरकार स्थापनेचा दावा करणार नसल्याचं सांगितल्यानंतर आता महाराष्ट्रात नवीन राजकीय समिकरणं उदयास येणार का याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजप-सेनेचं बिनसल्यानं आता शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने राज्याला स्थिर सरकार देणार का? याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते संजय निरुपम यांनी राज्यात शिवसेनेला समर्थन देण्यावरून चाललेल्या चर्चेवरून काँग्रेसला सुनावलं आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपसोबत सेनेचं जुळलं नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज आहे. दोन्ही पक्षांचे नेते यासाठी अनुकूल चर्चा करताना दिसत आहेत. यातच संजय निरुपम यांनी मात्र परखड मत व्यक्त केलं.

संजय निरुपम यांनी म्हटलं की, भाजप आणि शिवसेनेत चाललेला वाद हा एक नाटक आहे. त्यापलिकडं काही नाही आणि यामुळे काँग्रेसने यापासून दूर राहिलं पाहिजे असा सावधगिरीची सल्ला त्यांनी दिला. निरुपम यांनी ट्विट करून म्हटलं की, त्यांना काय झालं आहे? कोणताही काँग्रेस नेता शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कसा काय विचार करू शकतो? काँग्रेसने शिवसेनेच्या नाटकात अडकू नये ते खोटं आहे. सत्तेत जास्त वाटा मिळावा यासाठीचं त्यांच भांडण नेहमीचं आहे. माझ्या माहितीनुसार शिवसेना कधीच भाजपपासून दूर जाणार नाही.

काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याआधी त्यांना संजय निरुपम यांनी सावध केलं आहे. सेनेला पाठिंबा देणं ही निरर्थक गोष्ट आहे. आशा आहे की राज्यातील नेते यातलं सत्य समजून घेतील. सत्तेच्या चर्चेपेक्षा आपणाला 2014 च्या तुलनेत मते कमी मिळाली त्यावर पक्षाने चिंतन करायला हवं. एक पक्ष म्हणून आपण तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरलो आहे हे बघायला हवं असंही संजय निरुपम म्हणाले.

सध्या काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर ट्विट करताना संजय निरुपम यांनी म्हटलं की, राज्यात सध्याच्या परिस्थितीत कसेही सरकार स्थापन केले तरी ते स्थिर नसेल. लवकरच निवडणुका होतील आणि त्यासाठी तयार रहा. निवडणुका 2020 मध्येही होऊ शकतात. तेव्हा आपण निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेऊन लढणार का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

Loading...

संजय निरुपम यांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादी नेते यांनीही पाठिंब्याबाबत केलेल्या वक्तव्याने शिवसेनेसमोर अडचण निर्माण झाली आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं अजुन काही ठरलेलं नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं. याबाबतचा निर्णय कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आघाडीचे नेते एकत्र मिळून घेतील असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं. तसंच पाठिंबा देण्याबाबात शिवसेनेला कोणत्याही प्रकारची अट नव्हती असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला दावा करण्यास राज्यपालांनी बोलावलं आहे. भाजपने सत्ता स्थापनेस असमर्थ असल्याचं जाहीर केल्यानंतर आता राज्यात नवीन राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चार पक्षांच्या बैठकींचे सत्र सुरु झाले आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीशिवाय राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्याही कोअर कमिटीची बैठक होणार आहे. तर सत्ता स्थापनेला असमर्थता दर्शवणाऱ्या भाजपनेदेखील पुन्हा एकदा बैठक बोलावली आहे.

सेनेची शेवटच्या क्षणी कोंडी, पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

VIDEO : सत्तासंघर्षात भाजपकडून नवी खेळी; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

VIDEO : सत्तास्थापनेतील संघर्ष शिगेला, संजय राऊत यांनी भाजपबाबत केलं मोठं विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2019 11:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com