राज्यपालांची 'काळी टोपी' येते घटनात्मक जबाबदारीच्या आड, काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

राज्यपालांची 'काळी टोपी' येते घटनात्मक जबाबदारीच्या आड, काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

राज्यपाल काळी टोपी घालतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) लोकही काळी टोपी घालतात.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी आता शिवसेनेचे महाआघाडीतील इतर मित्र पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

राज्यपाल काळी टोपी घालतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) लोकही काळी टोपी घालतात. नेमका हाच मुद्दा उचलत सचिन सावंत यांनी राज्यपालावर निशाणा साधला आहे. राज्यपालांनी ही काळी टोपी काढून विचार केला तर त्यांना जबाबदारीची आठवण येईल. सीएम उद्धव ठाकरे यांचे विधान परिषद सदस्य नियुक्त करतील. त्यांची टोपीच घटनात्मक जबाबदारीच्या आड येत आहे, अशा शब्दांत सचिन सावंत यांनी राज्यपाल यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विश्वासू माणूस राज्यपालांच्या भेटीला, तिढा सुटला?

दरम्यान, विधान परिषदेची होऊ घातलेली निवडणूक कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्या आल्याने हा घटनात्मक पेच निर्माण झाला असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी म्हटलं आहे. कोरोनाची परिस्थिती आली नसती आणि विधान परिषदेची सात जागांसाठी निवडणूक झाली असती तर उद्धव ठाकरे सहज निवडून आले असते, असा दावाही त्यांनी केला आहे.

दुसरीकडे महाराष्ट्र विकाल आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच जनता दल आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर पक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी, यासाठी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जनतेच्या वतीने निवेदन दिले. तसेच उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती न करण्याच्या निर्णयामगील कारणे जनतेसमोर यावीत. त्यामुळे जनतेतील संभ्रम दूर होईल, असंही सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा.. कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा धोका वाढला, 20 दिवसांच्या बाळाला झाली लागण

खुद्द उद्धव ठाकरेंनी उचललं पाऊल..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी न दिल्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला आहे. राज्य सरकारकडून पुन्हा एकदा राज्यपालांना आठवण करून दिली आहे. पण, आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी या तिढ्यावर मार्ग काढण्यासाठी पाऊल उचलले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलींद नार्वेकर यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. राजभवन इथं ही भेट झाली. ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीचा विषय राज्यात चर्चेचा विषय असताना आज नार्वेकर यांनी राज्यपाल यांची भेट घेतली. नार्वेकर यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली होती.त्यामध्ये Corona virus च्या राज्यातल्या परिस्थितीवर, उपाययोजनांवर चर्चा झालीच, पण त्याबरोबर ठाकरे यांनी राज्यातल्या अनैतिक राजकारणाविषयी मोदींकडे तक्रार केल्याचं समजतं.

संकलन, संपादन- संदीप पारोळेकर

 

First published: April 30, 2020, 5:11 PM IST

ताज्या बातम्या