Home /News /maharashtra /

गिरे तो भी टांग उपर! अमित शहांच्या भूमिकेवर सचिन सावंत यांची जहरी टीका

गिरे तो भी टांग उपर! अमित शहांच्या भूमिकेवर सचिन सावंत यांची जहरी टीका

राज्यपालांनी संविधानाची चौकट यांनी मोडली. राज्यपालांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं.

मुंबई, 18 ऑक्टोबर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी Network18 ग्रुपचे एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांनी घेतलेल्या खास इंटरव्ह्यूमध्ये (exclusive interview) राज्यपाल कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रावर नाराजी व्यक्त केली. मात्र, त्यावर काँग्रेस पक्षाने भाजपवर टीका केली. 'गिरे तो भी टांग उपर' अशीच केंद्र सरकारची भूमिका असल्याची टीका काँग्रेस मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सुशांतसिंह प्रकरणी केंद्र सरकारच्या तीन यंत्रणा तपास करतात, पण हाती काहीच लागले नाही? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. हेही वाचा...'बेताल बडबड करणाऱ्या संजय राऊतांनी अमित शहांचं स्वागत करावं हा मोठा विनोदच' सचिन सावंत म्हणाले, अमित शहा यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर नाराजी व्यक्त केली. त्याबाबत फक्त नाराजी व्यक्त करून उपयोग नाही. राज्यपालांनी संविधानाची चौकट यांनी मोडली. राज्यपालांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं. यामुळे त्यांच्यावर करावाई करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारनं परत बोलवून घेतलं पाहिजं, अशी मागणी सचिन सांवत यांनी केली आहे. दुसरीकडे, राज्यपालांबद्दल गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. या आठवड्यात राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची यादी राज्य सरकार राज्यपालांना पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी 4 सदस्यांच्या नावांची यादी पाठवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  आता याबाबत राज्यपाल काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. 'ते शब्द टाळायला पाहिजे होते' दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक वादग्रस्त पत्र लिहिलं होतं. मंदिरं खुली करण्याची मागणी करणारं पत्र लिहिताना राज्यपालांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याची चर्चा झाली. याबाबत विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली असतानाच आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या पत्राबाबत भाष्य केलं आहे. हेही वाचा...राज्यपालांच्या 'त्या' पत्राबाबत अमित शहांची भूमिका योग्यच, संजय राऊत म्हणाले.. 'महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला होता. तुम्ही कधीपासून सेक्युलर झालात? असं राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना विचारलं. याकडे तुमचा पक्ष कसं बघत आहे?' असा प्रश्न 'न्यूज18'चे मुख्य संपादक राहुल जोशी यांनी अमित शहा यांना विचारला. यावर बोलताना अमित शहा म्हणाले की, 'राज्यपालांनी काही शब्द टाळले असते तर बरं झालं असतं.' 'मी ते पत्र वाचलं. त्यांनी एक संदर्भ देताना पत्रात तसा उल्लेख केला. मात्र ते टाळायला हवं होतं,' असं राज्यपालांच्या पत्राबद्दल बोलताना अमित शहा म्हणाले.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Amit Shah, Congress, Maharashtra, Udhav thackeray

पुढील बातम्या