'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला

'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला

एक्झिट पोलचे अंदाज समोर आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

अभिषेक पांडे, 22 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर अनेक संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. यातील सर्वच पोल्समध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे अंदाज समोर आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांनी निवडणूक प्रचारावरून काँग्रेसच्या नेतृत्वाला लक्ष्य केल्यानंतर काँग्रेसनेही पलटवार केला आहे. 'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही. शरद पवार यांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीचा कोणता नेता राज्यभर फिरला? अखेर प्रकृती चांगली नसतानाही 80 वर्षांच्या शरद पवारांना राज्यभर फिरून सभा घ्याव्या लागल्या,' असं म्हणत काँग्रेसचे महासचिव राजन भोसले यांनी राष्ट्रवादीच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते राष्ट्रवादीचे माजिद मेमन?

एक्झिट पोलनंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तू तू मैं मैं सुरू झालं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या संभाव्य पराभवाचं खापर काँग्रेसवर फोडलं आहे. 'पूर्ण निवडणुकीत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी दिसल्या नाहीत. राहुल गांधी आले पण काँग्रेसचेच नेते त्यांच्या सभांमध्ये दिसले नाहीत. फक्त शरद पवारांनीच एकट्याने मेहनत केली,' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी म्हटलं आहे.

'जनतेने आमच्या बाजूने कौल दिलेला नाही हे आम्हाला मान्य आहे, काँग्रेसशी आघाडी करणं हा आमचा नाईलाज होता. एकट्याने निवडणूक लढणं शक्य नव्हतं,' असंही माजिद मेमन म्हणाले. मेमन यांच्या या टीकेला आता काँग्रेसनेही उत्तर दिलं आहे. त्यामुळे आगामी काळात आघाडीतील हा संघर्ष अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

EXIT POLL मध्ये कोण ठरलं पैलवान? पाहा हा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: October 22, 2019, 11:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading