शरद पवारांवरील ED च्या कारवाईनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

शरद पवारांवरील ED च्या कारवाईनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

'महाराष्ट्र निवडणुकीला एक महिना बाकी असताना ही कारवाई करण्यात आली आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच याबाबत भाष्य केलं आहे. 'शरद पवार यांना केंद्र सरकारकडून टार्गेट केलं जात आहे. महाराष्ट्र निवडणुकीला एक महिना बाकी असताना ही कारवाई करण्यात आलीय, हा राजकीय संधीसाधूपणा आहे,' असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.

शरद पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर काँग्रेसने पहिल्यांदाच आक्रमक भूमिका घेतली आहे. याआधी काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाने पुढे येत अशी थेट भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून सत्ताधाऱ्यांना आव्हान देणार असल्याचा संदेश काँग्रेसकडून देण्याचा प्रयत्न आता होत आहे.

पोलीस सहआयुक्तांची पवारांना विनंती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. मात्र शरद पवार घराबाहेर पडल्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे शरद पवार यांनी आज घराबाहेर पडू नये, यासाठी पोलीस सहआयुक्त पवार यांच्याकडे त्यांच्या निवासस्थानी जाऊन विनंती केली.

राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे नोटीस बजावण्याआधीच ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. मात्र पवारांवरील कारवाईनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले आहेत. आजही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत जमण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

ईडी कार्यालयात जाण्यावर पवार ठाम

शरद पवार अद्यापही ईडी कार्यालयात जाण्याबाबत ठाम आहेत. त्यामुळे दुपारी 2 वाजता ते ईडीच्या कार्यालयात जातील. या पार्श्वभूमीवर फोर्ट परिसरात 144 कलाम लागू करण्यात आलं आहे. शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ईडी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

VIDEO: '...तर आम्ही सहन करणार नाही', पवारांच्या मुद्द्यावरुन धनंजय मुंडे आक्रमक

First published: September 27, 2019, 11:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading