साताऱ्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट, पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंविरोधात लढणार नाहीत!

साताऱ्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट, पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंविरोधात लढणार नाहीत!

पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा निवडणूकच लढवणार असल्याची माहिती आता मिळाली आहे.

  • Share this:

सातारा, 30 सप्टेंबर : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उदयनराजे भोसले यांच्याविरोधात सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा निवडणूकच लढवणार असल्याची माहिती आता मिळाली आहे.

उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी अचानक पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव समोर आलं. पण ही निवडणूक लढवण्यास ते फारसे उत्सुक नव्हते. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे चव्हाण यांच्या नावासाठी आग्रही होते. त्यानंतर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी हायकमांडला आपला निर्णय कळवला असून ते कराड दक्षिण मतदारसंघातून विधानसभा निवडणूकच लढवतील, अशी माहिती मिळाली आहे.

उदयनराजेंविरोधात कोण?

साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजे यांना आपल्या लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे आता सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत उदयनराजेंची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीतून 4 दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तसंच शशिकांत शिंदे, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांची नावंही राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत.

उदयनराजेंना पराभवाची भीती?

'खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक घ्यावी. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी,' या अटी भाजप प्रवेशावेळी उदयनराजेंनी ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे उदयनराजेंना आपण पराभूत होऊ शकतो, ही भीती आहे का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड

Published by: Akshay Shitole
First published: September 30, 2019, 2:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading