Elec-widget

शिवसेनेबाबत पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप

शिवसेनेबाबत पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप

शिवसेनेसोबतच्या महाशिवआघाडीवरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवाट लागू झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रित सत्तास्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर काही नेत्यांची आज बैठकही झाली. अशातच शिवसेनेसोबतच्या महाशिवआघाडीवरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

'राज्यात नवं स्थापन करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. परंतु आधी आमची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा होईल. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोघे मिळुन शिवसेनेसोबत चर्चा करू. मात्र शिवसेना महाआघाडीसोबत येऊ नये म्हणून भाजपचे प्रयत्न सुरू आहेत,' असा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर केला आहे. चव्हाण यांच्या या आरोपाला आता भाजप कसं उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

उद्धव ठाकरे आणि राज्यातील काँग्रेस नेत्यांची पहिली बैठक

मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपपासून फारकत घेतलेल्या शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू केली आहे. त्यानंतर आज काँग्रेसच्या नेत्यांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठकही झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी संभाव्य आघाडीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. 'घाई करू नका. लवकरच निर्णय येईल. चर्चा योग्य दिशेने सुरू झाली आहे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना आणि काँग्रेसमध्ये झालेल्या आजच्या बैठकीत किमान समान कार्यक्रम काय राहील यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह सुभाष देसाई, अशोक चव्हाण , बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे हे नेते उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर देखील चर्चा झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या संभाव्य आघाडीच्या उभारणीसाठी हालाचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

Loading...

शिवसेनेचा नेमका गेम कुणी केला? पडद्यामागे नेमकं काय घडतंय? पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2019 04:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...