Home /News /maharashtra /

औरंगाबादच्या नामांतराचे महाविकास आघाडीमध्ये पडसाद, 200 काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

औरंगाबादच्या नामांतराचे महाविकास आघाडीमध्ये पडसाद, 200 काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

महाविकास आघाडी सरकारनं शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला (Aurangabad renamed as Sambhajinagar) मंजुरी दिली. ठाकरे सरकारनं शेवटच्या दिवशी घेतलेल्या या निर्णयाचे पडसाद उमटले आहेत.

    औरंगाबाद, 30 जून (अविनाश कानडजे) : महाविकास आघाडी सरकारनं शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला (Aurangabad renamed as Sambhajinagar) मंजुरी दिली. ठाकरे सरकारनं शेवटच्या दिवशी घेतलेल्या या निर्णयाचे महाविकास आघाडी सरकारमध्ये पडसाद उमटण्यास सुरूवात झालीय. काँग्रेसपक्षतून या निर्णयाला तीव्र विरोध होतोय. औरंगाबादच्या 200 काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर झाल्यामुळे हे राजीनामे देण्यात आलेत. शहराध्यक्ष,अल्पसंख्याक सेल अध्यक्ष, माजी शहराध्यक्ष यांच्यासह 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शहराच्या नामांतराचा मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. 1988 मध्ये औरंगाबादच्या सभेत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा हा औरंगाबादचे नाव संभाजीनगर नारा दिला होता. तेव्हापासून औरंगाबादेत शिवसेनेकडून औरंगाबादचे संभाजीनगर असा शहराचा उल्लेल केला जातो. 9 नोव्हेबर 1995 या वर्षात राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे  नामकरण करण्यासाठी असा प्रस्ताव औरंगाबाद महापालिकेने पाठवला. मात्र 2001 ला काँग्रेस आघाडी सरकाने रद्द ठरवला. आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत असताना संभाजीनगरचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यावर ठाकरे सरकारनं राजीनाम्याच्या काही तास आधी निर्णय घेतला. शहरात पैसे खर्च करूनही मिळतं नाही पाणी, महिलांनी मांडलेल्या व्यथांचा पहा VIDEO याआधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (New Mumbai International Airport) दि. बा. पाटील यांचं नाव देण्यास ठाकरे सरकारनं मंजुरी दिली. त्याचबरोबर उस्मानाबादचे नामांतर धाराशीव असे करण्यात आले आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Aurangabad, Aurangabad News

    पुढील बातम्या