संगमनेर, 25 डिसेंबर : 'पेपर फुटी प्रकरणी ( paper leak case) राज्यातील कोणताही मंत्री अडकण्याचा विषय नाही या प्रकरणात जे दोषी असतील त्याला शिक्षा झालेली दिसून येईल. राज्याची यंत्रणा सक्षम असून आम्हाला कोणा दुसऱ्याला निमंत्रण देण्याची गरज काय? असं म्हणत काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी सीबीआय चौकशीच्या मागणीवरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्यावर निशाणा साधला.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा पार पडला. पेपर फुटी प्रकरणी जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालेली दिसेल. आमची यंत्रणा सक्षम असून दुसऱ्या कुणाला निमंत्रण देण्याची गरज काय? असा सवाल त्यांनी सीबीआय चौकशीच्या मागणीवर उपस्थित केला आहे.
कच्च्या तेलाच्या किंमती कमी असताना केंद्राने गरिबांच्या खिशातून पैसे काढले. याउलट जीएसटीचे पैसे आजही आम्हाला दिले नाही. राज्य सरकार पगारासाठी, विकास कामासाठी कर्ज काढत आहे. विरोधकांनी केंद्राकडून पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न केले तर जास्त चांगलं होईल, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.
VIDEO - नवरदेवाचं तोंड पाहताच नवरीबाईची सटकली; लग्न राहिलं बाजूला आधी केली धुलाई
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचे देशाने कौतुक केले आहे. मात्र आज ते आजारी आहेत अशा प्रसंगी त्यांच्यावर टीका करू नये. चंद्रकांत पाटील एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनीही हे संकेत पाळले पाहिजे, असं म्हणत थोरात यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
पतंग उडवताना 10 वर्षांचा मुलगा इमारतीवरून खाली कोसळला, सळई घुसली पोटात आरपार!
लोकसभेत ज्या पद्धतीने अध्यक्षांची निवड होते. ती पद्धत आम्ही स्वीकारली आहे. विधानपरिषदेत ही तशीच प्रक्रिया असते. सोमवारी ही निवडणूक जाहीर केली जाईल आणि मंगळवारी प्रक्रिया पूर्ण होईल. अध्यक्षपदाचा उमेदवार सोनिया गांधी ठरवतील तो आम्हा सर्वांना मान्य राहील, असंही थोरात यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.