मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षणासाठी अंमलबजावणी करा', नसीम खान यांचं बाळासाहेब थोरातांना पत्र

'मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षणासाठी अंमलबजावणी करा', नसीम खान यांचं बाळासाहेब थोरातांना पत्र

काँग्रेस नेते नसीम खान (Naseem Khan) यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना मुस्लीम आरक्षणासाठी पत्र पाठवलं आहे. आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला दिलेल्या पाच टक्के आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 22 डिसेंबर : "आघाडी सरकारने (Aghadi Government) मुस्लीम (Muslim) समाजासाठी 5 टक्के आरक्षण (Reservation) दिले होते. या आरक्षणाची अमंलबाजणी आजपर्यंत झालेली नाही. मुस्लीम समाजाचे आरक्षण आणि अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजनांना भरघोस निधी मिळाला पाहिजे. यासाठी काँग्रेस पक्षाने पाठपुरावा करावा", अशी मागणी माजी मंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान (Naseem Khan) यांनी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे केली आहे. नसीम खान यांचं बाळासाहेब थोरांताना पत्र नसीम खान यांनी विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांना याबाबत पत्र पाठवलं आहे. "काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार असताना आपण मुस्लीम समाजासाठी 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने मान्यताही दिली होती. पण त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मुस्लीम आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही. आघाडी सरकारमध्ये मी अल्पसंख्याक विभागाचा मंत्री या नात्याने समाजासाठी अनेक योजनाही राबविल्या होत्या. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजासाठी भरघोस निधी देऊन विविध योजनाही राबवण्यात आल्या", असं नसीम खान यांनी पत्रात म्हटलंय. हेही वाचा : पहिला दिवस गाजवला, आता पुढे काय? रणनीती आखण्यासाठी भाजपची मुंबईत डिनर डिप्लोमेसी 'अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी भरघोस निधीची तरतूद करा' "काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊन 2 वर्षे झाली पण 5 टक्के मुस्लीम आरक्षणाची अमंलबजावणी झालेली नाही. आता त्याअनुषंगाने विचारविमर्श करावा आणि अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी भरघोस निधीची तरतूदही करावी", अशी मागणी त्यांनी केली. 'सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारे चालतं' "महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारे चालेल, असे आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सोनिया गांधी यांनी सुचित केलेले आहे. त्यामुळे आपण शासनाकडे याचा पाठपुरावा करुन अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून द्यावा", असे या पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
First published:

पुढील बातम्या