Home /News /maharashtra /

हातात धनुष्यबाण घेऊन नाना पटोलेंनी आदिवासी नृत्यावर ठरला ठेका, VIDEO

हातात धनुष्यबाण घेऊन नाना पटोलेंनी आदिवासी नृत्यावर ठरला ठेका, VIDEO

वेळी आदिवासी मुद्द्यावर नाना पटोले, अतुल लोंढे आणि प्रणिती शिंदे यांनी ठेका धरला.

    फैजपूर, 23 जून : काँग्रेसचे  (congress) प्रदेशाध्यक्षपद स्विकारल्यापासून नाना पटोले (nana Patole) यांची तुफान फटकेबाजी पाहण्यास मिळत आहे. कधी भाजपवर (bjp) तर कधी आपल्याच मित्र पक्षावर नाना पटोले टीका करताना पाहण्यास मिळाले. आज जळगाव (jalgaon) दौऱ्यावर आले असता नाना पटोले यांनी आदिवासी नृत्यावर चांगलाच ठेका धरला. विशेष म्हणजे, धनुष्यबाण हाती घेत नानांनी आदिवासी नृत्याचा आनंद लुटला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज खान्देश दौऱ्यावर आहेत. फैजपूर येथे नाना पटोले यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आदिवासी मुद्द्यावर नाना पटोले, अतुल लोंढे आणि प्रणिती शिंदे यांनी ठेका धरला.  नाना पटोले नृत्य करत म्हटल्यावर त्यांच्यासोबत इतर नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले. यावेळी, आदिवासी नृत्य करत असताना धनुष्यबाण हातात घेत नाना पटोले यांनी चांगलाच ठेका धरला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांच्या प्रती जाळून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. तसंच, धुळे, नंदुरबार आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्याला ते भेट देऊन काँग्रेस पक्षातर्फे सुरु असलेल्या मदत कार्याचा आणि संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहेत. बारावीनंतर कॉमर्समध्ये करिअर करायचंय? मग हे कोर्सेस करा आणि मिळवा भरपूर पगार या दौऱ्यात नाना पटोले या भागातील कोविड सेंटर आणि कोविड रुग्णालयांना भेट देतील तसंच काँग्रेस पक्षातर्फे सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेणार आहेत. तसंच ठिकठिकाणी ते काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही संवाद साधून संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहेत. पटोले यांचा चार दिवसांचा दौरा जळगाव जिल्ह्यापासून सुरू होऊन २६ जून रोजी नाशिक येथे त्याची सांगता होईल.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Congress, Nana Patole, काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष

    पुढील बातम्या