काँग्रेसला आणखी एक धक्का, कल्याणराव काळे भाजपच्या वाटेवर

काँग्रेसला आणखी एक धक्का, कल्याणराव काळे भाजपच्या वाटेवर

सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरु झाली आहे.

  • Share this:

सोलापूर, 29 मार्च: लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यावरुन काँग्रेसमधून अनेक नेते बाहेर पडत असताना आता पक्षाला सोलापूरमधून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरु झाली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी जिल्ह्यातील बडे नेते पक्षात घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून सुरु आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात काळे भाजपमध्ये प्रवेश करतील. जर काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्याचा पहिला फटका शरद पवार यांना बसण्याची शक्यता आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माढा मतदारसंघातील काही भागात काळे यांचा प्रभाव आहे. लोकसभा निवडणुकीतील निकाल फिरवण्यासाठी काळे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळेच भाजपकडून देखील त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे काळे हे काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे काळे यांचा भाजप प्रवेश शिंदे यांच्यासाठी देखील धक्का असेल.

यासाठी कल्याणराव महत्त्वाचे

विधानसभा निवडणुकीत माढातून 65 हजार मते काळे यांनी घेतली होती. पंढरपूरचे तरुण नेते अशी त्यांची ओळख आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी भाजपच्या मतदाने मोठे झालेले नेते संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीने स्वत:कडे घेऊन उमेदवारी दिली होती. त्यामुळे शिंदे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे.

VIDEO माझं पहिलं भाषण का ट्रोल झालं? पाहा पार्थ पवार काय म्हणाले..

First published: March 29, 2019, 12:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading