मुंबई, 14 जुलै : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यपदाची धुरा स्वीकारल्यानंतर थोरात यांनी मनसेबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
'लोकशाही आणि पुरोगामी मुल्य टिकवण्यासाठी आताचं सरकार घालवायचं आहे. हे सरकार घालवण्यासाठी सर्वांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर सोबत आहोतच पण वंचित आघाडी आणि मनसेलाही आगामी निवडणुकीत सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे,' असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी मनसेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
बाळासाहेब थोरातांचा निर्धार
'प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीत यशस्वी होणार आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात आघाडीचं सरकार येणार,' असं म्हणत काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर थोरात यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेत आपला अजेंडा स्पष्ट केला.
'आमच्या पक्षातून काही लोक गेले. पण जेव्हा कोणी पक्ष सोडत असतं त्याच्याजागी नवीन लोकांना संधी मिळून तरुण नेतृत्व निर्माण होत असतं. त्यामुळे गेलेल्या लोकांची चिंता नाही. आम्ही सर्व नेते आता एकदिलाने काम करून आगामी काळात महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणू,' असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
VIDEO: पत्नीने गर्लफ्रेंडसोबत पाहिलं पतीला, बेडरूममध्ये केली बेदम धुलाई!