महाराष्ट्राचा नवा विरोधी पक्षनेता कोण होणार? बाळासाहेब थोरात म्हणतात...

महाराष्ट्राचा नवा विरोधी पक्षनेता कोण होणार? बाळासाहेब थोरात म्हणतात...

निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई, 25 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 'आम्हाला सत्ता स्थापन करण्याइतक्या जागा मिळवण्यात अपयश आलं आहे. मात्र समाधानकारक जागा नक्कीच मिळाल्या आहेत,' असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

निवडणूक निकालानंतर भाजप आणि शिवसेना सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील कोणता नेता विधानसभेचा विरोधी पक्षनेता होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबतच्या प्रश्नावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यावं, याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा होईल. त्यानंतर याचा निर्णय घेण्यात येईल.'

थोरात यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

- मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत समस्या आहे .त्याचा परिणाम दिसून आला.

- स्थानिक पातळीवरून संघटन अधिक मजबूत करायला पाहिजे.

- शिवसेनेकडून प्रस्ताव आलेला नाही

- शिवसेनेनं भाजपच्या प्रभावतून बाहेर यायला हवं. त्यानंतर आम्ही दिल्लीशी बोलू

- मनसे आणि वंचित सोबत नव्हते, पण त्यांचा नेमका किती परिणाम हे पाहिलेलं नाही.

- काश्मीर आणि कलम 370 हे राज्यात यशस्वी ठरले नाही

- महाराष्ट्रात काँग्रेसचे दिग्गज नेते प्रचारात आले होते

- आमच्या नेत्यांनी दोनशेहून अधिक सभा वेगवेगळ्या नेत्यांच्या झाल्या आहेत

दरम्यान, महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाला बहुमतासाठीच्या जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आता भाजप - शिवसेनेच्या वाटाघाटींमध्ये नेमकं काय ठरतंय याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. सत्तास्थापनेसाठीच्या वाटाघाटींमध्ये भाजप - शिवसेनेत कायकाय राजकीय नाट्य घडतं हेही पाहावं लागेल. उद्धव ठाकरे त्यांच्या 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनीही 15 बंडखोर आपल्या संपर्कात असल्याचं भाष्य केलं आहे. आकड्यांच्या या खेळात सत्तास्थापनेच्या 3 शक्यता आहेत.

VIDEO: भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची मुसंडी; 'या' जिल्ह्यात सुपडासाफ

First published: October 25, 2019, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading