डाव उलटवणार, CM फडणवीसांविरोधात काँग्रेस देणार तगडा उमेदवार

डाव उलटवणार, CM फडणवीसांविरोधात काँग्रेस देणार तगडा उमेदवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आम्ही तगडा उमेदवार देऊ, असं म्हणत थोरातांनी भाजपला आव्हान दिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेतील निकालाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या छाननी समितीच्या गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत अनेक बैठका झाल्या. नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसची पहिली यादी 20 सप्टेंबरला जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यासंदर्भातील छाननी समितीची दिल्लीत जवळपास अकरा तास बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक जिल्ह्यात मागितलेल्या दोन जागा संदर्भात देखील छाननी समितीच्या बैठकीत गांभीर्याने विचार करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांवर डाव उलटवणार, तगडा उमेदवार देणार

लोकसभा निवडणुकीपासून भाजपने थेट काँग्रेसच्या नेतृत्वाचीच कोंडी करण्याची रणनीती आखली होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची त्यांच्या नांदेड मतदारसंघात कोंडी केली. परिणामी चव्हाण यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही भाजपचे यादृष्टीनेच प्रयत्न सुरू आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या संगमनेर मतदारसंघात अडकवून ठेवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. भाजपच्या याच खेळीला काँग्रेसकडून आता जोरदार प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. बाळासाहेब थोरात यांनी त्याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आम्ही तगडा उमेदवार देऊ, असं म्हणत थोरातांनी भाजपला आव्हान दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक रंजक होण्याची शक्यता आहे.

प्रियांका गांधी प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार?

काँग्रेसच्या छाननी समितीची चौथी बैठक नुकतीच पार पडली. याबाबत अजून एक बैठक होण्याची शक्यता आहे. येत्या 25 सप्टेंबरपूर्वी ही बैठक होईल अशी माहिती आहे. प्रियंका गांधी यांनी महाराष्ट्रात प्रचार करावा अशी आग्रही मागणी आम्ही केली असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. त्यामुळे प्रियांका गांधी महाराष्ट्रात प्रचारासाठी येवून काँग्रेसला नवसंजीवनी देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बापरे! गाणं गाता गाताच गेला त्यांचा जीव, पाहा VIDEO

First Published: Sep 19, 2019 12:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading