Home /News /maharashtra /

यूपीमध्ये गुंडाराज! राहुल गांधींना धक्काबुक्कीवरून बाळासाहेब थोरात संतापले

यूपीमध्ये गुंडाराज! राहुल गांधींना धक्काबुक्कीवरून बाळासाहेब थोरात संतापले

हाथरस सामूहिक बलात्कार पीडित परिवाराच्या भेटीसाठी जाताना काँगेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अडवून त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली.

    मुंबई, 1 ऑक्टोबर: हाथरस सामूहिक बलात्कार पीडित परिवाराच्या भेटीसाठी जाताना काँगेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अडवून त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली. एवढंच नाही तर त्यांना खाली पाडलं. राहुल गांधी व प्रियांका गांधी याना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. यूपीमध्ये गुंडाराज आहे. यूपी पोलिसांनी राहुल गांधी यांना अशा पद्धतीनं अडवणं चुकीचं आहे. या घटनेचे राज्यात पडसाद उमटू शकता, काँग्रेस कार्यकत्यांमध्ये राग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. हेही वाचा...पार्थ पवार यांची 'सत्यमेव जयते'कडे वाटचाल सुरू, चंद्रकांतदादांनी वाढवला सस्पेन्स दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांच्या या पाशवी वृत्तीचा अनुसूचित जाती जमातीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी देखील तीव्र शब्दात निषेध केला आहे. हाथरसची घटना ही मनुवादी मानसिकतेतून घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा सरकारच्या काळात अश्या प्रकारच्या असंख्य घटना घडत आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद देशात उमटले असून सगळ्याच स्तरावरून संताप व्यक्त केल्या जात आहे. हाथरस येथे जात असतांना राहुल गांधी यांची पोलिसांनी कॉलर धरली व धक्काबुक्की करून जमिनीवर पाडले, ही घटना अतिशय निंदनीय असून याचा तीव्र शब्दात डॉ राऊत यांनी निषेध नोंदवला आहे. मोदी व योगी सरकार पीडितेच्या कुटुंबाला भेटून न देण्यासाठी ही एकप्रकारे दडपशाही करत असल्याचे राऊत म्हणाले. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी केली अटक दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे हाथरस प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघाले होते. राहुल गांधी यांनी तेथील काही जणांकडून अडविण्यात आले व उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्काराचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरत आहे. आज हाथरस येथे 144 कलमाअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आल्याने तेथे कोणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली होती. देशभरातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. हाथरस येथे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत होतं. यामध्ये उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी राहुल गांधी यांची कॉलर पकडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांसोबत झालेल्या धक्काबुक्कीत राहुल गांधी जमिनीवर कोसळले. यावेळी त्यांच्यासोबत काही काँग्रेस कार्यकर्ते व नेतेही होते. मात्र, अशाही परिस्थितीत राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे सांगितले...'कितीही झालं तरी मी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही', असे ते यावेळी पोलिसांना सांगत होते. या धक्काबुक्कीत मोठा जमाव येथे उपस्थित होता. त्यांच्या या धक्काबुक्कीची व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हेही वाचा...'ये देखो आजका हिंदुस्तान' धक्काबुक्कीदरम्यान राहुल गांधींची उद्विग्न प्रतिक्रिया हाथरस येथे काही दिवसांपूर्वी एक मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली होती. यामध्ये मुलीची जीभ कापण्यात आली होती व शिवाय तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचीही माहिती समोर आली होती. उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांची परवानही न घेता त्या मुलीवर रात्री 2.30 च्या दरम्यान पोलिसांनी अंत्यसंस्कार केल्याचे समोर आल्यानंतर मोठा गदारोळ झाला. देशभरातून आक्रोश व्यक्त केला जात आहे. आणि पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस सरकारनेही योगी सरकारच्या या कारवाईवर संताप व्यक्त करीत राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान ते आज पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी हाथरस येथे गेले होते.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या