समर्थकांना मंत्रिपदं मिळण्यासाठी काँग्रेस नेत्यांचं दिल्लीत लॉबिंग, कुणाचा लागणार नंबर?

समर्थकांना मंत्रिपदं मिळण्यासाठी काँग्रेस नेत्यांचं दिल्लीत लॉबिंग, कुणाचा लागणार नंबर?

नागपूर मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा असा या काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली, 3 डिसेंबर : राज्यात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्या समर्थकांचा नंबर लागावा यासाठी राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनिया गांधी यांच्या दरबारात आले आहेत. काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल सायंकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली.

बाळासाहेब थोरात आणि सोनिया गांधी यांच्यात जवळपास तीस मिनिटे झालेल्या भेटीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा थोरात यांनी केला आहे. दुसरीकडे, नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हेदेखील दिल्लीत आले असून तेदेखील सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. सोबतच काँग्रेसचे दुसरे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत हे देखील दिल्लीत देण्याची शक्यता असून तेदेखील काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

नागपूर मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा असा या काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. आपल्या समर्थकांना मंत्रिपद मिळावं, यासाठीची आग्रही मागणी करण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सोनिया गांधींच्या दरबारी आल्याची माहिती आहे.

दरम्यान, आगामी मंत्रिमंडळात काँग्रेसला 13 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 9 कॅबिनेट, 4 राज्यमंत्री असणार आहेत.

कॅबिनेटपदासाठी काँग्रेस नेत्यांची संभाव्य नावे

विदर्भ( 3) : विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर

मुंबई(2): वर्षा गायकवाड, अमीन पटेल

मराठवाडा (2): अशोक चव्हाण, अमित देशमुख

पश्चिम महाराष्ट्र (2): सतेज बंटी पाटील, विश्वजित कदम

9 कॅबिनेट मंत्रिपदांसह काँग्रेसला 4 राज्यमंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

मंत्रिपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीतून कुणाची नावं आहेत चर्चेत?

शिवसेना

दिवाकर रावते, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील

राष्ट्रवादी

धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे

उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांनी घेतली आहे मंत्रिपदाची शपथ?

एकनाथ शिंदे

सुभाष देसाई

जयंत पाटील

छगन भुजबळ

बाळासाहेब थोरात

नितीन राऊत

Published by: Akshay Shitole
First published: December 3, 2019, 9:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading