महाविकास आघाडीत 'बिघाडी' नाही, पण...बाळासाहेब थोरात यांनी केला मोठा खुलासा

महाविकास आघाडीत 'बिघाडी' नाही, पण...बाळासाहेब थोरात यांनी केला मोठा खुलासा

राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी नाही. आघाडी भक्कम आहे

  • Share this:

शिर्डी, 5 जुलै: राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी नाही. आघाडी भक्कम आहे, एकत्र आहे आणि एकत्र काम करत आहे. काही लोक आघाडीत बिघाडी होण्याची वाट पाहात आहेत, असा टोला महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना लगावला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यात पारनेरमध्ये सहा शिवसेना नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच्या प्रश्नावर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा...बारामतीत मोठी कारवाई! पत्त्याच्या क्लबवर छापा, 33 जणांना अटक, लाखोंचा ऐवज जप्त

संगमनेर तालुक्यातील शिपलापूर येथे दंडकारण्य अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा नामोल्लेख न करता टीका केली. यावेळी दंडकारण्य अभियनाअंतर्गत थोरातांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं

काय म्हणले बाळासाहेब थोरात...

कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या तिजोरीत घट ही वस्तुस्थीती आहे. मात्र आवश्यक तो खर्च करावाच लागत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दुसरा हप्ता देणं देखील बाकी आहे. त्यासाठीही राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. अडचणी असंख्य आहे. परंतु त्यातून मार्ग काढत असल्याचे महसूलमंत्री थोरात यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा...मुख्यमंत्र्यांचं मोठं पाऊल, राज्यातील हॉटेल्स सुरू करण्यासंदर्भात लवकरच निर्णय

शिक्षण खात्याने गाडी खरेदीचा प्रस्ताव टाकला होता. काम करताना वाहनांची गरज भासत असते. परंतु गाडी खरेदीची बातमी अपुऱ्या माहितीच्या आधारे देण्यात आल्या. सहा गाड्यांचा प्रस्ताव असताना एकच गाडी मंजूर झाली. परंतु त्याविषयीच्या बातम्या मात्र जास्त चालल्या, असा उपरोधिक टोला महसूलमंत्री थोरात यांनी लगावला आहे.

First published: July 5, 2020, 7:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading