हरिष दिमोटे, 18 ऑक्टोबर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शिर्डीत काँग्रेसची प्रचार सभा पार पडली. या प्रचारसभेत थोरात यांनी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आणि भाजपचे शिर्डीतील उमदेवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसंच निवडणूक निकालाबाबतही भाष्य केलं.
'काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात ईडीचा वापर होत आहे. मात्र भाजपमध्ये गेले की ते शुद्ध कसे होतात? भाजप ईडीचा वापर राजकारणासाठी करत आहे. छगन भुजबळ, शरद पवार आणी आता प्रफुल्ल पटेल यांच्यावरही इडीचा विळखा पडला आहे. त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्यांच्यामागे आम्ही उभं राहू,' असं आश्वासन बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे. 'लोकशाहीत अशा प्रकारे ईडीचा वापर करणं चुकीचं असून अशा गोष्टीचा विरोध करण्यासाठी 21 तारखेला भाजपच्या विरोधात मतदान करणं हेच जनतेचं त्यांना उत्तर असेल,' असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
निवडणूक निकालाबाबत भाष्य
'मुख्यमंत्री एक महिन्यापूर्वी अब की बार 220 पार असं म्हणत होते. मात्र आता होत असलेल्या कोणत्याही सभेत 220 चा आवाज बंद झाला आहे. कारण आता भाजपाची निकराची लढाई सुरू असून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार आहे,' असा आत्मविश्वासही प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे
विखेंवर हल्लाबोल, बालेकिल्ल्यात जहरी टीका
विखे पाटील साडेचार वर्ष विरोधी पक्षनेतेपदी राहिले. साडे चार वर्षात भाजप सेनेला भंडावून सोडलं. इतका त्रास दिला की मुख्यमंत्री मित्र झाले.
आज जातील उद्या जातील चर्चा सुरू होती अखेर भाजपमध्ये गेलेच. मी काँग्रेसचा राज्याचा अध्यक्ष झालो. आता राज्यभर फिरत आहे. पण त्यांची अवस्था काय झालीय? हे मंत्री झाले आणि गावात फिरत आहेत. भाजपमध्ये गेल्यावर हे बैठकीला तिसऱ्या रांगेत बसतात. ते ही मोबाईल मध्ये डोकं घालून,' असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या राधाकृष्ण विखेंचा चांगलाच समाचार घेतला.
2 तासांपासून प्रफुल पटेल यांची चौकशी, पाहा ईडी कार्यालयातून GROUND REPORT