कट्टर राजकीय विरोधकांचा एकत्र विमान प्रवास, जिल्ह्यात जोरदार चर्चा

कट्टर राजकीय विरोधकांचा एकत्र विमान प्रवास, जिल्ह्यात जोरदार चर्चा

निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांनंतर या दोन नेत्यांनी पहिल्यांदाच एकत्र प्रवास केल्याने नगर आणि शिर्डी जिल्ह्यामध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे.

  • Share this:

शिर्डी, 15 जुलै : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांनी दिल्लीला जाताना एकत्र विमान प्रवास केला आहे. निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांनंतर या दोन नेत्यांनी पहिल्यांदाच एकत्र प्रवास केल्याने नगर आणि शिर्डी जिल्ह्यामध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे.

लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेस नेते आणि विखे पाटलांचे कट्टर राजकीय विरोधक बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंवर जोरदार टीका केली. त्यामुळे या विखे-थोरातांमधील राजकीय संघर्ष टोकाला गेला होता. पण आता या दोन नेत्यांनी एकत्र प्रवास करत कटुता दूर करण्याचा प्रयत्न केला, असं म्हटलं जात आहे.

बाळासाहेब थोरातांचा दिल्ली दौरा

काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. या भेटीत महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकारणीत फेरबदल करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभवातून काँग्रेसने चांगलाच धडा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल करण्यात आला. त्यामुळे आता इतरही पदांवर तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आता काँग्रेसमध्ये नक्की कोणते बदल करण्यात येणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

VIDEO: माणूसकी मेली, वृद्धास साखळीने बांधून केली बेदम मारहाण

First published: July 15, 2019, 3:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading