काँग्रेस मंत्र्याची राज ठाकरेंच्या मनसेवर जोरदार टीका, मोर्चाआधी मुंबईत रणकंदन

काँग्रेस मंत्र्याची राज ठाकरेंच्या मनसेवर जोरदार टीका, मोर्चाआधी मुंबईत रणकंदन

काँग्रेस नेते आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मनसेवर खरमरीत टीका केली आहे.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, मुंबई, 30 जानेवारी : 'मोहम्मद अली रोडवरून मोर्चा काढण्याची मनसेची मागणी म्हणजे मृतावस्थेत आलेल्या पक्षाला चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न आहे. मनसे जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत आहे,' अशी खरमरीत टीका काँग्रेस नेते आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.

मनसेच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. यावेळी नेत्यांकडून पक्षाच्या मोर्चासाठी भायखळा ते आझाद मैदान पर्यंतच्या रस्त्याची परवानगी मागण्यात आली. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि शिरीष सावंत यांच्या नेतृत्वात मनसेचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी गेले होते. मनसेच्या मोर्चाबाबतच्या निर्णयाचा चेंडू आता आयुक्तांच्या कोर्टात आहे.

मनसेच्या भूमिकेमुळे पेच वाढणार?

'बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांना हाकलून द्या,' या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच एक मोर्चा काढणार आहे. मात्र या मोर्चाबाबत मनसेनं घेतलेल्या भूमिकेमुळे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - अजित पवारांना भेटवस्तू दिल्याने अधिकाऱ्याला बसला दंड!

मुस्लीम बहुल भागातून मनसे सीएए आणि एनआरसी विरोधात मोर्चा काढणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

हेही वाचा - नथुराम गोडसे आणि पंतप्रधान मोदींचा विचार एकसमान, राहुल गांधींचं खळबळजनक विधान

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 23 जानेवारीच्या महामेळाव्यात पाकिस्तानी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध आक्रमक भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर राज यांचा CAA आणि NRCला पाठिंबा आहे असं बोललं जात होतं. घुसखोरांविरुद्ध मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी केली होती.

First published: January 30, 2020, 5:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या