देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवत पृथ्वीराज चव्हाणांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवत पृथ्वीराज चव्हाणांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राज्य सरकारकडून पॅकजेची मागणी करणाऱ्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चव्हाण यांनी फटकारलं आहे.

  • Share this:

मुंबई, 25 मे : 'मोदी सरकारने जाहीर केलेलं पॅकजे हा एक जुमला आहे,' असं म्हणत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देशातील आर्थिक स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना लक्ष्य केलं आहे. तसंच राज्य सरकारकडून पॅकजेची मागणी करणाऱ्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही चव्हाण यांनी फटकारलं आहे.

'मोदी सरकारने हट्टीपणा सोडला पाहिजे. नाहीतर देशात अराजकता निर्माण होईल आणि त्याला मोदी सरकार जबाबदार असेल. देवेंद्र फडणवीस यांनी बजेटवर पुस्तक लिहिलं आहे. त्यांना अधिक माहीत आहे की राज्य सरकार कधीही पॅकेज देत नाही. केंद्र सरकार पॅकेज देत असतं. राजकारणासाठी फडणवीस तशी मागणी करत असतील तर ठीक आहे. उद्या म्हणाल की मुंबई महापालिका आणि नागपूर महापालिकेने काय पॅकेज जाहीर केलं,' असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवली आहे.

'भारतात आर्थिक मंदीचं जागतिक स्तरावर भाकीत करण्यात आलं आहे. 20 लाख कोटी घोषणा केली तेव्हा आम्ही स्वागत केलं. मात्र अर्थमंत्र्यांनी 5दिवस प्रदीर्घ प्रेस घेतली त्यात आमची निराशा झाली. त्यात कोणतीही मदत नाही तर फक्त कर्ज आहे. प्रोत्साहन योजना जाहीर करणं अपेक्षित आहे. 20 लाख कोटी पैकी फक्त 2 लाख कोटी खर्च होणार आहे. बाकी सर्व कर्ज घेण्याचा सल्ला दिला आहे. तोट्यात गेलेल्या उद्योगांना बँक कर्ज देणार नाही. ही कर्ज घेतली की ती परत होणार नाही आणि पुन्हा त्याला माफ करावं लागेल. दुःखावर मीठ चोळण्याचा हा प्रयत्न आहे. पुढील वर्षात अर्थव्यवस्था उणे पाच टक्के होईल, असं सांगितलं आहे. सरकारला नवीन अर्थव्यवस्था मांडावी लागणार आहे,' असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे :

- सरकारने थेट अनुदान दिलं पाहिजे

- कोरोनाच्या लढाईत सरकार कमी पडलं आहे

- खोदा पहाड और अशी अवस्था निर्मला सीतारामण यांची झाली आहे

- सरकारला कितीही कर्ज काढावे लागले, नोटा छापाव्या लागल्या तरी अर्थचक्र थांबता कामा नये

- अर्थमंत्री यांनी msme साठी घोषणा केल्या आहेत

-त्यात अनेक npa झाली आहेत

- 6 कोटी 34 लाख सूक्ष्म उद्योग आहेत

- त्यात त्यांना रोख रक्कम द्यायला पाहिजे

- काही लोकांचं प्रोव्हडेट फंड भरणं हे स्वागतार्ह आहे

- पण कामगारांचे कापपलेले 2 टक्के ही सरकारने भरले पाहिजे

- मनरेगा 40 हजार कोटी रुपयांनी वाढ केली आहे

- पंतप्रधान यांनी याच्या आधी मनरेगाची खिल्ली उडवली होती

- मोदींनी आता देशाची माफी मागितली पाहिजे

- शेतकऱ्यांना ही थेट पैसे देण्यात यावे

- कर्ज देऊन काही होणार नाही

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 25, 2020, 5:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading