Home /News /maharashtra /

'मंत्रिपद गेलं तरी चालेल...', काँग्रेस नेत्याचं आक्रमक वक्तव्य; आरक्षणावरून वातावरण तापलं

'मंत्रिपद गेलं तरी चालेल...', काँग्रेस नेत्याचं आक्रमक वक्तव्य; आरक्षणावरून वातावरण तापलं

राजकीय नेत्यांकडून आरक्षणाबाबत टोकदार विधानं केली जात असल्याचं चित्र आहे.

    औरंगाबाद, 5 डिसेंबर : आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. राजकीय नेत्यांकडून आरक्षणाबाबत टोकदार विधानं केली जात असल्याचं चित्र आहे. 'मंत्रिपद गेलं तरी चालेल मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही,' असं वक्तव्य ओबीसी कार्यकर्ता परिषदेत काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यात आरक्षणाबाबत नवा पेच निर्माण झाला आहे. अशातच काही मराठा संघटनांनी आमचा समावेश ओबीसींमध्ये करा, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध ठिकाणी ओबीसी नेत्यांकडूनही बैठका घेण्यात येत आहेत. त्यातच औरंगाबादमध्ये घेण्यात आलेल्या परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिलासा देत म्हटलं की, 'ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सर्व नेत्यांचं आश्वासन आहे, मंत्रिपद गेलं तरी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही,' असं वडेट्टीवार म्हणाले. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे. मराठवाडा ओबीसी कार्यकर्ता परिषदेत गोंधळ मराठवाडा ओबीसी कार्यकर्ता परिषदेत गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या समोरच मंचावर हा गोंधळ झाला. बालाजी शिंदे यांनी भाषण करताना छगन भुजबळ यांनी पाप केलं, असे वक्तव्य केल्याचा आरोप करीत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांना शांत केलं. मग ओबीसी गप्प बसतील का? छगन भुजबळांचंही आक्रमक विधान नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. 'समता परिषद मराठा आरक्षणाविरोधात नाही. मात्र,ओबीसींना धक्का लागत असेल तर ओबीसी गप्प बसणार नाही. तुम्ही धमक्या देतात लाठी काठी तलवारीच्या... मग काय ओबीसी गप्प बसतील? शरद पवार कुठून आरक्षण देणार? मोर्चा काढून काय उपयोग? शरद पवार यांनी मराठा समाजाला कधीच आरक्षण नाकारलं नाही. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी मोर्चे सुरू आहेत,' असं भुजबळ म्हणाले.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Maratha reservation, ओबीसी OBC

    पुढील बातम्या